कार्तिक शुद्ध एकादशी

From Wikipedia, the free encyclopedia

कार्तिक शुद्ध एकादशी

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.

Thumb
१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना यामागे आहे.[१] कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.[२]

Thumb
तुळशीचे लग्न

प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.

वारकरी संप्रदाय

कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते.[३] वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी आणि कार्तिकी एकादशांना उपवास करतात.

आवळी भोजन

आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल.[४] या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.

हे ही पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.