कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष. कार्तिक हा शब्द हिंदी-नेपाळी-संस्कृतमध्ये कार्त्तिक असा लिहितात. या महिन्यामध्ये इतर महिन्यांप्रमाणेच शुक्ल (शुद्ध) आणि कृष्ण (वद्य) नावाचे दोन पक्ष (पंधरवडे) असतात.
भारत सरकार प्रणीत भारतीय राष्ट्रीय पंचांगातील महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणेच असल्याने त्याही पंचांगानुसार कार्तिक हा वर्षातील आठवा महिना असतो. त्या पंचागानुसार हा महिना २३ ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणि तिसाव्या दिवशी २१ नोव्हेंबर या तारखेला संपतो.
कार्तिक महिना हा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत येतो.
कार्तिक महिन्यात अनेकदा क्षयमास येतो.
कार्तिक महिन्यात येणारे सण
शुक्ल पक्ष :
प्रतिपदा - हिला बलिप्रतिपदा म्हणतात. या दिवशी दिवाळीतला पाडवा असतो. या दिवशी विक्रम संवताचे (याचा वर्षक्रमांक इसवी सनाच्या आकड्यात ५७-५६ मिळवल्यास मिळतो) आणि जैन संवताचे (याचा वर्षक्रमांक इसवी सनाच्या आकड्यात ५२७-५२६ मिळवल्यास मिळतो) नवीन वर्ष सुरू होते. बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा, गौ क्रीडा आणि अन्नकूट हेही सण असतात. या दिवशी सागर जिल्ह्यातील रमछिरिया येथे देवगोवर्धन मेळा आणि इंदूर जिल्ह्यातील गौतमपुरा गावात हिंगोट युद्ध असते.
द्वितीया - या दिवशी भाऊबीज आणि यम द्वितीया असते. याच दिवशी वाशीम जिल्ह्यातील डव्हा गावातल्या विश्वनाथबाबांची पुण्यतिथी असते. चित्रगुप्त देवाची पूजाही याच दिवशी असते.
तृतीया - विश्वामित्र जयंती.
पंचमी - पांडव पंचमी; कड पंचमी. जैनांची ज्ञान पंचमी. याच दिवशी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे तुळशीमाय पुण्यतिथी असते. गुरू गोविंदसिंह पुण्यतिथी.
षष्ठी - सूर्य षष्ठी. डाला षष्ठी. वर्धा जिल्ह्यातील पळसगाव वाई गावात सखुबाई पुण्यतिथी; अकोला जिल्ह्यातील कोंडोली गावात मौनीमहाराज पुण्यतिथी.
सप्तमी - जलाराम जयंती. या दिवशी सहस्रबाहू जन्मोत्सव असतो.
अष्टमी - गोपाष्टमी. ; या दिवशी कृष्ण पहिल्यांदा गुरे चरायला गेला होता. या दिवशी धुळे जिल्ह्यातील देवपूर गावात बापूजी भंडारी पुण्यतिथी असते.
नवमी - अक्षय नवमी; आवळे नवमी; कूष्मांड नवमी. ह्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळे भोजनाचा कार्क्रम असतो. या दिवशी नागपूरला गोविंदबाबा रोंघे पुण्यतिथी असते.
दशमी - या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ गावात अवधूतानंदस्वामी यांची पुण्यतिथी असते.
एकादशी - प्रबोधिनी (देवउठनी) एकादशी' महाराष्ट्रात सार्वत्रिक उपवासाचा दिवस. पंढरपूरची कार्तिक वारी. हिंगोली जिल्ह्यातील नर्सीनामदेव गावात नामदेव जयंती. विष्णूप्रबोधोत्सव. जळगाव येथे श्रीराम रथोत्सव. चातुर्मासातला शेवटचा दिवस. तुळशी विवाहांना आरंभ. देवदिवाळी. कवी कालिदास जयंती (?). आवळी भोजनाचा दिवस ?).
द्वादशी - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावात ज्योतिर्लिंग काटेबारस. कवी कालिदास जयंती (?). महाराष्ट्रात लग्न-मुंजींच्या मुहूर्तांना सुरुवात.
त्रयोदशी - गोरक्षनाथ प्रकट दिन (?). काहींच्या मते वैशाख पौर्णिमा (अक्षय जयंती) हा गोरखनाथांचा प्रकट दिन आहे.
चतुर्दशी - वैकुंठ चतुर्दशी.
पौर्णिमा : त्रिपुरारी पौर्णिमा. अमरावती जिल्ह्यातील बहिराम गावात बहिरामबुवांची यात्रा. क्षेत्र रामटेक येथे प्रभु रामचंद्र देवस्थान यात्रा. कार्तिकस्नान समाप्ती. स्नानदान पौर्णिमा. व्रत पौर्णिमा. गुरू नानक जयंती. मुंबईच्या महालक्ष्मी देवळातला अन्नकूट महोत्सव. अमरावती जिल्ह्यात कौंडिण्यपूर यात्रा.अमरावती जिल्ह्यातील वरखेड गावात अडकुजी महाराज पुण्यतिथी. बीड जिल्ह्यातील कपिलधारा गावात मन्मथस्वामी यात्रा. तुळशीच्या लग्नांचा शेवटचा दिवस.
कार्तिक कृष्ण पक्ष
प्रतिपदा (या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात अगहन-मार्गशीर्ष महिना सुरू होतो.) : नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा तेथे पांडुरंग रथ-यात्रा; अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे सदानंद ब्रह्मचारी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव; बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा येथे सोनाजी महाराज यात्रा; अकोला जिल्ह्यातील सुलतानपूर येथे परशुराम महाराज पुण्यतिथी उत्सव; जबलपूरजवळील भेडाघाट येथे भेडाघाट मेळा.
तृतीया : वर्धा जिल्ह्यातील कापशी गावात नानाजी महाराज पुण्यतिथी .
चतुर्थी : नागपूर जिल्ह्यातील काटोल गावात पुरुषोत्तम महाराज जयंती.
पंचमी : नागपुरात मुकुंदराज महाराज साधू पुण्यतिथी; अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर गावात पांडुरंगाची यात्रा. मायानंद चैतन्य जयंती
षष्ठी : अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथे बळिराम महाराज पुण्यतिथी; छिंदवाडा जिल्ह्यातील बानावाकोडा गावात रामजीबाबा जयंती
अष्टमी : कालभैरव जयंती; कालभैरवाष्टमी, पारनेर जिल्ह्यातील गारगुंडी गावात पाटीलबुवा गोविंद झावरे पुण्यतिथी.
नवमी : अमरावती जिल्ह्यातील बग्गी गावात मणिरामबाबा पुण्यतिथी; वर्धा गावातील विरूळ आबा गावात आबाजी महाराज यात्रा.
एकादशी : उत्पत्ती/उत्पन्ना एकादशी; आळंदी यात्रा.
द्वादशी : अमरावती जिल्ह्यातील एकवीरादेवी गावात जनार्दनस्वामी पुण्यतिथी; बिरसा मुंडा जयंती.
त्रयोदशी : दासगणू महाराज पुण्यतिथी; आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज सामाधी उत्सव; जालना जिल्ह्यातील नाव्हा गावात रंगनाथ महाराज पुण्यतिथी.
चतुर्दशी : संत तुकडोजी जयंती.
अमावास्या : वाशीम जिल्ह्यातील लोणी गावात सखाराम महाराज पुण्यतिथी व महापंगत.
हिंदू पंचांगानुसार बारा महिने | |
← कार्तिक महिना → | |
शुद्ध पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा |
कृष्ण पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.