करमाळा
सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका From Wikipedia, the free encyclopedia
सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका From Wikipedia, the free encyclopedia
करमाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. करमाळा हे नगरपरिषद असलेले शहर आहे. ही स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार शंकरराव येवले यांची कर्मभूमी आहे.
?करमाळा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राशिन |
विभाग | पश्चिम महाराष्ट्र |
जिल्हा | सोलापूर |
भाषा | मराठी |
तहसील | करमाळा |
पंचायत समिती | करमाळा |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 413202 • MH45 |
करमाळा हे कमलादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.[1] हे मंदिर राऊराजे निंबाळकर यांनी इ.स. १७२७ साली बांधले. या देवीस तुळजापूरच्या तुळजा भवानीचा अवतार मानले जाते. या मंदिरात ९६ या अंकाचे खूप महत्त्व आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीने बांधलेल्या या मंदिराचे एक प्रवेशद्वार आग्नेय दिशेला तर दुसरे उत्तर दिशेला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यास ९६ खांब व ९६ खिडक्या आहेत. मंदिरात ९६ चित्रे आहेत व मंदिरातील विहिरीस ९६ पायऱ्या आहेत. येथे नवरात्रीचा सण खूप भक्तिभावाने साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपासून चतुर्थीपर्यंत येथे वार्षिक यात्रा असते. कमलादेवी मंदिराच्या इतिहासवर येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार शंकरराव येवले यांनी जय अंबे कमलाभवानी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात कमलादेवीच्या भव्य मंदिराची आणि करमाळा परिसराच्या इतिहासाबद्दल सखोल माहिती आहे.
करमाळा तालुक्यातील बाळेवाडी ही सीना नदीकाठावरील संत यादवबाबांची जन्मभूमी आहे.
या तालुक्यातून सीना व भीमा नदी गेली आहे. त्यामूळे नदीकडचा भाग बागायत आहे. या भागात ऊसाची जास्त लागवड केली जाते. तसेच या तालुक्यातून रेल्वेमार्ग जातो.
करमाळा तालुक्यातील काही गावे (वर्णानुक्रमे):
बाळेवाडी, वीट,अंजनडोह, कामोणे, कुंभेज, केम, कोंढेज, गुळसडी, खडकी (करमाळा), खडकेवाडी, जेऊर, तरटगाव, देवळाली, पांगरे, पांडे, पुनवर, भोसे, मांगी, वरकटणे, शेलगाव, सर्पडोह, साडे, घोटी, सालसे, निमगांव
हिंगणी, पारेवाडी, सौंदे, रावगाव, बोरगाव, खांबेवाडी, पाडळी, घारगाव, निलज, पोथ्रे, वांगी, जिंती, भिलारवाडी, देलवडी, उंदरगाव, निमगांव
निंभोरे, जेऊरवाडी, कोंढेज, मलवडी, पाथुर्डी, कंदर, बिटरगाव, गुळसडी (गुरसुळी), शेटफळ, पांडे, हिसरे, शेलगाव (क), फिसरे, सातोली, वडशिवणे, ढोकरी, वांगी-1 ते 4, उमरड,पु.सोगाव वाशिंबे, केत्तुर, पोमलवाडी, खडकेवाडी,केडगांव, लव्हे , कुंभारगाव, सावडी, दिवेगव्हण, पोथरे , खातगाव, मांजरगाव , कात्रज, कोंढार चिंचोली, टाकळी , कोर्टी , विहाळ , मोर्वाड , कुगाव बिटरगाव , गोयेगाव , कंदर , पांडे , अर्जुननगर
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.