भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
सय्यदा अन्वरा तैमूर (२४ नोव्हेंबर १९३६ - २८ सप्टेंबर २०२०) ह्या एक भारतीय राजकारणी होत्या. त्या ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ दरम्यान भारतीय आसाम राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. [१] त्या आसाममधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) सदस्य होत्या. २८ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचे ऑस्ट्रेलियात निधन झाले.[२]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २४, इ.स. १९३६ आसाम | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर २८, इ.स. २०२० | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
|
त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. अन्वरा १९५६ मध्ये देबीचरण बरुआ गर्ल्स कॉलेज, जोरहाटमध्ये अर्थशास्त्राच्या लेक्चरर होत्या.
आसामच्या इतिहासात त्या राज्याच्या एकमेव महिला आणि मुस्लिम मुख्यमंत्री होत्या. [३] ६ डिसेंबर १९८० ते ३० जून १९८१ पर्यंत त्या आसामच्या मुख्यमंत्री होत्या.[४] [३] भारतीय इतिहासातही सय्यदा अन्वरा तैमूर या कोणत्याही राज्याच्या पहिल्या मुस्लिम महिला मुख्यमंत्री होत्या. [५] राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट असताना त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपला.
सन् १९७२, १९७८, १९८३ आणि १९९१ मध्ये त्या आसाम विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्य (आमदार) होत्या.[३] [४] १९८८ मध्ये त्यांना राज्यसभेत नामांकित करण्यात आले.[३] [६] १९९१ मध्ये त्यांची आसाममध्ये कृषी मंत्री पदावर नियुक्ती झाली.[७]
अन्वरा २०११ मध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये सामील झाल्या.[३]
२८ सप्टेंबर २०२० रोजी ऑस्ट्रेलियात हृदयविकाराच्या झटक्याने तैमूर यांचा मृत्यू झाला, जिथे त्या त्यांच्या मुलासोबत गेली चार वर्षे राहत होत्या.[३] [४] [८] [२]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.