छत्रपती संभाजीनगर जिल्हा (पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा) हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील मुख्य शहर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आहे. येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | छत्रपती संभाजीनगर विभाग |
मुख्यालय | औरंगाबाद |
तालुके | १ खुलताबाद २ छत्रपती संभाजीनगर तालुका ३ सोयगाव ४ सिल्लोड ५ गंगापूर ६ कन्नड ७ फुलंब्री ८ पैठण ९ वैजापूर |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १०,११० चौरस किमी (३,९०० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | २७,०१,२८२ (२०११) |
-लोकसंख्या घनता | २८६ प्रति चौरस किमी (७४० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | १०,८७,१५० |
-साक्षरता दर | ६१.१५ |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | (सुनिल चव्हाण २०२१-२२) |
-लोकसभा मतदारसंघ | औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, जालना लोकसभा मतदारसंघ |
-विधानसभा मतदारसंघ | १ पैठण, २.फुलंब्री, ३.सिल्लोड, ४ औरंगाबाद पश्चिम, ५ औरंगाबाद पूर्व, ६ औरंगाबाद मध्य, ७ कन्नड, ८ गंगापूर, ९ वैजापूर |
-खासदार | इम्तियाज जलील (छत्रपती संभाजीनगर) |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ७३४ मिलीमीटर (२८.९ इंच) |
प्रमुख_शहरे | पैठण, सिल्लोड, वेरूळ |
संकेतस्थळ |
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुहम्मद तुघलकांनी दौलताबाद येथे आपली राजधानी वसवली होती तसेच औरंगजेबाचे वास्तव्य तिथे अधिक काळ होते.[1]
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी. असून लोकसंख्या २७,०१,२८२ (२०११ जनगणना) इतकी आहे. शहरी भागात छावणी तर ग्रामीण भागात लासूर ही मोठी बाजारपेठ आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पीके - कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या - गोदावरी, तापी, पूर्णा ह्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ टेकड्या - म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी ह्या आहेत.
नामांतर
२०२२ मध्ये, महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा करण्याचे घोषित केले. परंतु २४ एप्रिल २०२३ मध्ये औरंगाबादच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका निकाली निघेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगरचा अधिकृत संपर्क आणि रेकॉर्डमध्ये वापर करण्यास मनाई केली. ७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत राज्याला नवीन नाव वापरण्यापासून परावृत्त करण्यास सांगण्यात आले होते.[2]
पुढे, महाराष्ट्र राज्य शासनाने १५ सप्टेंबर २०२३ रोजी राजपत्र प्रकाशित करुन औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा असे अधिकृतपणे बदलले आहे. या जिल्ह्याच्या नावासोबतच औरंगाबाद उपविभाग, औरंगाबाद तालुका, आणि औरंगाबाद गाव/शहर ही नावे देखील बदलण्यात आली आहेत.[3][4]
हवामान
औरंगाबाद साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
सरासरी कमाल °से (°फॅ) | 29.7 (85.5) |
32.5 (90.5) |
36.1 (97) |
39.0 (102.2) |
39.9 (103.8) |
34.9 (94.8) |
30.3 (86.5) |
29.1 (84.4) |
30.4 (86.7) |
32.6 (90.7) |
30.9 (87.6) |
29.3 (84.7) |
32.89 (91.2) |
सरासरी किमान °से (°फॅ) | 14.2 (57.6) |
16.3 (61.3) |
20.2 (68.4) |
23.7 (74.7) |
24.6 (76.3) |
23.0 (73.4) |
21.8 (71.2) |
21.1 (70) |
20.9 (69.6) |
19.7 (67.5) |
16.4 (61.5) |
14.0 (57.2) |
19.66 (67.39) |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 2.2 (0.087) |
2.9 (0.114) |
5.1 (0.201) |
6.3 (0.248) |
25.5 (1.004) |
131.4 (5.173) |
167.0 (6.575) |
165.0 (6.496) |
135.3 (5.327) |
52.6 (2.071) |
29.3 (1.154) |
8.4 (0.331) |
731 (28.781) |
स्रोत: IMD[मृत दुवा] |
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
बीबी का मकबरा हे मोगल सम्राट औरंगजेब यांचे अपत्ये, आजम शहा यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगज़ेबयांची पत्नी राबिया दुर्रानी, यांची कबर आहे. बीबी का मकबरा यास सन्मानाने डेक्कनचा ताजमहाल, पश्चिमचा ताजमहल म्हणतात.
अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत.
'एलोरा लेणी हे एक रॉक-कट हिंदू मंदिर लेणी संकुल आहे, ज्यात 600-1000 CE च्या काळातील कलाकृती आहेत, औरंगाबाद जिल्हा]] महाराष्ट्र]], भारत.[5] एलोरा ही युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे.[6]
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरू करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणी व पक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे.[7]
दौलताबाद किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात, हा भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील दौलताबाद गावात स्थित एक ऐतिहासिक तटबंदी असलेला किल्ला आहे. ही यादव घराण्याची राजधानी होती (9वे शतक-14वे शतक CE), काही काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी (1327-1334), आणि नंतर अहमदनगर सल्तनतची दुय्यम राजधानी (1499-1636)
- घृष्णेश्वर मंदिर
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.
पाणचक्की म्हणून ओळखली जाणारी पाणचक्की. हे स्मारक महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आहे, मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेतील वैज्ञानिक विचार प्रक्रिया प्रदर्शित करते. डोंगरावरील झऱ्यातून खाली आणलेल्या पाण्याद्वारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती. सुफी संत बाबा शाह मुसाफिर यांच्या दर्ग्याला जोडलेली ही इमारत महमूद दरवाज्याजवळील बागेत आहे आणि त्यात मशीद, मदरसा, कचेरी, मंत्र्याचे घर, सराई आणि झानानांसाठी घरे आहेत.
- पैठण - संत एकनाथ यांचे गाव
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण (Jayakwadi dam). ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
जिल्ह्यातील तालुके
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.