![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/06/Vijaysinh_Mohite_Patil_2014-05-19_00-16.jpg/640px-Vijaysinh_Mohite_Patil_2014-05-19_00-16.jpg&w=640&q=50)
विजयसिंह मोहिते
From Wikipedia, the free encyclopedia
विजयसिंह मोहिते-पाटील (१२ जून १९४४) हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील एक राजकारणी आहेत. विजयदादा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. २००३-०४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे ६ वे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मोहिते-पाटील हे महाराष्ट्र विधानसभेवर १९८० ते २००९ दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले होते. त्यांनी २५ वर्षे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री म्हणून काम केले आहे.
जलद तथ्य मतदारसंघ, मागील ...
विजयसिंह मोहिते | |
![]() | |
मतदारसंघ | माढा |
---|---|
कार्यकाळ १६ मे २०१४ – १९ मे २०१९ | |
मागील | शरद पवार |
पुढील | रणजितसिंह नाईक निंबाळकर |
मतदारसंघ | माढा |
कार्यकाळ २७ डिसेंबर २००३ – १९ ऑक्टोबर २००४ | |
मागील | छगन भुजबळ |
पुढील | आर आर पाटील |
कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य | |
कार्यकाळ ९ नोव्हेंबर २००४ – १ डिसेंबर २००८ | |
कार्यकाळ १९ ऑक्टोबर १९९९ – १६ जानेवारी २००३ | |
कार्यकाळ ४ मे २०१२ – १६ मे २०१४ | |
मतदारसंघ | राज्यपालांद्वारे नामनिर्देशित |
कार्यकाळ १९८० – २००९ | |
मागील | शामराव भीमराव पाटील |
पुढील | हनुमंत डोळस |
मतदारसंघ | माळशिरस विधानसभा मतदारसंघ |
जन्म | जून १२, इ.स. १९४४ महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
पत्नी | नंदिनीदेवी |
अपत्ये | *रणजितसिंह
|
निवास | शिवरत्न बंगला, अकलूज, माळशिरस |
व्यवसाय | राजकारणी |
धर्म | हिंदू |
बंद करा
सहकारमहर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांचे ते पुत्र आहेत. त्यांचे मोहिते पाटील घराणे हे राजकीयदृष्ट्या खूप प्रभावी मानले जाते.[1][2][3]
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते-पाटील ह्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत ह्यांचा सुमारे २५,००० मतांनी पराभव केला.