![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/ba/Leonardo_self.jpg/640px-Leonardo_self.jpg&w=640&q=50)
लिओनार्दो दा विंची
From Wikipedia, the free encyclopedia
लिओनार्दो हा १५ व्या शतकात रेनेसान्स (प्रबोधन )काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्दो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राऊन या लेखकाने नुकतीच 'दा व्हिंची कोड' या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
लिओनार्दो दा विंची | |
![]() लाल खडूने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१५१२ - १५१५). हे चित्र त्याने काढलेले अस्सल आत्मव्यक्तिचित्र असल्याचे 'मानले' जाते. | |
पूर्ण नाव | लिओनार्दो दी सेर पिएरो दा विंची |
जन्म | एप्रिल १५ १४५२ आंकियानो, फ्लॉरेन्स, इटली |
मृत्यू | मे २, १५१९ आंब्वास, इंद्र-ए-ल्वार, फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | इटालियन ![]() |
कार्यक्षेत्र | चित्रकला, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, पुराजीवशास्त्र, शरीरशास्त्र, भूमिती, गणित, भौतिकशास्त्र, यामिकी |
प्रशिक्षण | आंद्रेआ देल वेर्रोच्चिओकडे उमेदवारी |
चळवळ | प्रबोधनकाळ |