विकिपीडिया:उल्लेखनीयता
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी विकिपीडिया हा एक स्वतंत्र प्रकल्प असून मराठी प्रकल्प स्वतःचे ज्ञानकोशीय निकष लक्षात घेतो, इतर भाषी विकिपीडियाचे संकेत लक्षात घेतले तरी त्यांचे अंधानुकरण करत नाही. विकिमीडियाच्या उद्दिष्टास धरून मराठी आणि महाराष्ट्रीय आवश्यकता लक्षात घेऊन ही एक प्रदीर्घ आणि नेहमीकरताची प्रक्रिया आहे. या विषयावर मराठी विकिपीडियाची स्वतःची नीती बनवण्याची आवश्यकता प्रतिपादित केल्ली गेली आहे, याबद्दल आपले विचार चर्चा पानावर व्यक्त करता येतील.
- ज्ञानकोशीय उल्लेखनीयता साशंकित असलेल्या लेखांवर अथवा चर्चा पानांवर {{उल्लेखनीयता}} लावला जातो. ज्या चर्चा पूर्ण झाल्या आहेत त्या चर्चांना सुयोग्य प्रचालकीय कार्यवाहीनंतर साचा:उल्लेखनीयतासंपन्नचर्चा लघुपथ {{उसंच}} साचा लावला जातो.
हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे. हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. |