From Wikipedia, the free encyclopedia
फिरेंत्से किंवा फ्लोरेन्स (इटालियन: Firenze, उच्चार ) ही इटली देशाच्या मधील तोस्काना प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्लोरेन्स शहराची लोकसंख्या सुमारे ३.७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १५ लाख आहे.
फिरेंत्से (फ्लोरेन्स) Firenze |
||
इटलीमधील शहर | ||
|
||
गुणक: 43°47′N 11°15′E |
||
देश | इटली | |
प्रदेश | तोस्काना | |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ८० | |
क्षेत्रफळ | १०२.४ चौ. किमी (३९.५ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | १६४ फूट (५० मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ३,७०,७०२[1] | |
- घनता | ३,६२० /चौ. किमी (९,४०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
comune.firenze.it |
ऐतिहासिक काळापासून फ्लोरेन्स हे इटली व युरोपामधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले गेले आहे. विशेषतः मध्ययुग व रानिसां काळांत चित्रकला, शिल्पकला व वास्तूशास्त्र ह्या विषयांमध्ये फ्लोरेन्सचे योगदान अमुल्य मानले जाते. सर्वानुमते रानिसांचा उगम फ्लोरेन्स येथेच झाला. मध्ययुगात व्यापार व अर्थकारणारे केंद्र असलेले फ्लोरेन्स हे त्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या व श्रीमंत शहरांपैकी एक होते.[2][3] रानिसां दरम्यानच्या फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाची फ्लोरेन्स ही राजधानी होती.
येथील ऐतिहासिक वास्तूंमुळे फ्लोरेन्स हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले गेले आहे व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. फ्लोरेन्समध्ये अनेक कला दालने व संग्रहालये असून येथे दरवर्षी अंदाजे १५ लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.
फ्लोरेन्स इटली व युरोपमधील अनेक शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. फिरेंझे सांता मरिया नोव्हेल्ला रेल्वे स्थानक शहरातील सगळ्यात मोठे स्थानक असून याशिवाय फिरेंझे रिफ्रेदी आणि फिरेंझे काम्पो दि मार्ती रेल्वे स्थानक ही इतर मोठी स्थानके आहेत.
फिरेंझे अमेरिगो व्हेस्पुची विमानतळ येथून जगभरातील अनेक शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.