भारताचे १३ वे पंतप्रधान From Wikipedia, the free encyclopedia
डॉ.मनमोहन सिंह (मराठीत : मनमोहनसिंह ) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पंतप्रधान होते. हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.[1]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
मनमोहन सिंग | |
कार्यकाळ मे १९, इ.स. २००४ – मे २६, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रतिभा पाटील |
---|---|
जन्म | २६ सप्टेंबर, १९३२ गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | गुरूशरण कौर |
अपत्ये | ३ |
धर्म | शीख |
मनमोहनसिंहांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंह आणि आईचे नाव अमृतकौर. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमन्त्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंहांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.[ संदर्भ हवा ]
या शिवाय त्यांनी आन्तरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.[ संदर्भ हवा ]
पहा : भारताचे अर्थमन्त्री
काँग्रेसचे युवा नेते सत्यजित ताम्बे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता, परन्तु ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला व ५ मे २०१९ रोजी दूरचित्रवाणीवर आला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.