पंजाब विद्यापीठ

From Wikipedia, the free encyclopedia

पंजाब विद्यापीठ

पंजाब विद्यापीठ ( PU ) हे चंदीगड येथे स्थित एक भारतीय महाविद्यालयीन सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला राज्य आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांमार्फत निधी दिला जातो. [१] याची स्थापना १८८२मध्ये लाहोरमध्ये झाली. भारताच्या फाळणीनंतर चंदीगढमध्ये वेगळ्या विद्यापीठाची स्थापना १ ऑक्टोबर, १९४७ रोजी झाली. याला आधी पूर्व पंजाब विद्यापीठ असे नाव होते. सुरुवातीला या विद्यापीठेच आवार सोलन येथील लश्करी छावणीमध्ये होते. नंतर ते चंदीगडमधील स्थलांतरित झाले. तेव्हा या विद्यापीठाला पंजाब विद्यापीठ नाव देण्यात आले. या विद्यापीठाला एनएएसीच्या पंचतारांकित स्तरावर ए++ (सर्वोच्च) मान्यता आहे.

पंजाब विद्यापीठाचे आवार चंदीगड शहरातील सेक्टर १४ आणि २५ मध्ये ५५० एकर (२२० ha) प्रदेशात विस्तारलेले आहे. [२]

Thumb
वसंत ऋतुमध्ये पंजाब विद्यापीठातील एक रस्ता.

उल्लेखनीय लोक

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या विद्यापीठाचे विद्यार्थी होते.

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.