एल्फिन्स्टन रोड, अधिकृतपणे प्रभादेवी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहराच्या परळ-दादर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे. मध्य मार्गावरील परळ हे स्थानक एल्फिन्स्टन रोडसोबत एका पादचारी पुलाने जोडण्यात आले असून येथे मार्ग बदलणे शक्य आहे. सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. जलद गाड्या येथे थांबत नाहीत.

प्रभादेवी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
लोअर परळ
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दादर
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.
जलद तथ्य स्थानक तपशील, पत्ता ...
एल्फिन्स्टन रोड (प्रभादेवी)

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता परळ, मुंबई
गुणक 19°00′27″N 72°50′10″E
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
प्रभादेवी is located in मुंबई
प्रभादेवी
प्रभादेवी
मुंबईमधील स्थान
बंद करा

नाव

ह्या स्थानकाचे नाव मुंबईचा गव्हर्नर जॉन एल्फिन्स्टनच्या गौरवार्थ ठेवण्यात आले होते. ते १८५३-१८६० पर्यंत बॉम्बेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त होते. महाराष्ट्र विधानसभेने प्रभादेवी या नावानिमित्त १६ डिसेंबर २०१६ रोजी ठराव केला.[1] प्रभादेवी हे नाव हिंदू देवी प्रभाती देवी असे आहे. एक १८व्या शतकातील मंदिराच्या आतच देवीची बारावी शतकातील मूर्ती स्थित आहे.[2] ६ मे २०१७ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मंजूर केला.[3][4] पश्चिम रेल्वे यांनी १९ जुलै २०१८ रोजी नाव बदलण्यास सुरुवात केली.[5][6][7]

जवळचे भाग

  • के.इ.एम. हॉस्पिटल
  • वाडिया हॉस्पिटल
  • टाटा हॉस्पिटल

शाळा, कॉलेज, ई.

  • एम.डी. कॉलेज
  • शिरोडकर शाळा
  • संत पॉल शाळा

महत्त्वाची ठिकाणे

  • राज्य परिवहन स्थानक, परळ

दुर्घटना

२९ सप्टेंबर, २०१७ रोजी येथील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होउन २३ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि ५०पेक्षा अधिक जखमी झाल्या होत्या.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.