From Wikipedia, the free encyclopedia
डहाणू तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
?डहाणू तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
आमदार | विनोद निकोले |
उपसभापती | पिंटू गहला [1] |
तहसील | डहाणू तालुका |
पंचायत समिती | डहाणू तालुका |
तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[2]
डहाणू तालुक्यात खालील गावे समाविष्ट आहेत.
येथे मुख्यतः आदिवासी समाजाची वस्ती आहे. आदिवासी जमातीत शुभ प्रसंगी तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविले जाते. आदिवासी समाजातील ठराविक लोक हे तारपा वाजवणारे असतात आणि त्यांना तारपाकरी नावाने ओळखले जाते.तारपाकरी लोकांची संख्या कमी होत आहे. डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील सचिन सातवी ह्यांनी आयुष संस्थेतर्फे तारपा वाद्यांची निर्मिती आणि तारपा वाजविण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करायला सुरुवात केली आहे. तारपा हे पालघर या आदिवासी जिल्ह्याचा मानबिंदू आहे. लग्नसोहळा, विविध महोत्सव, कौटुंबिक कार्य इत्यादी कार्यक्रमात तारपा नृत्य संगीत सादर केले जाते.[4] डहाणू तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात २८५० विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[5]
डहाणू तालुक्यात भारतीय नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या गावातील गावजत्रांना सुरुवात होते. प्रमुख गावजत्रा खालीलप्रमाणे आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.