From Wikipedia, the free encyclopedia
देहाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे सावटा रस्त्याने जाऊन नंतर डहाणू-वाणगाव रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६५१ कुटुंबे राहतात. एकूण ३२१४ लोकसंख्येपैकी १५९५ पुरुष तर १६१९ महिला आहेत. गावाची साक्षरता ५६.३२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६७.७८ आहे तर स्त्री साक्षरता ४५.१४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५४९ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १७.०८ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
चारी तर्फे कोटेबी,आगवण, मोठापाडा, पाळे, कोटबी, धामणगाव, कोमगाव, वाणकास, दापचरी, वरखंडे,खुबाळे ही जवळपासची गावे आहेत.देहाणे-पाळे ग्रामपंचायतीमध्ये देहाणे आणि पाळे ही गावे येतात.
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.