![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/52/Ipl.svg/langmr-640px-Ipl.svg.png&w=640&q=50)
२०१६ इंडियन प्रीमियर लीग
From Wikipedia, the free encyclopedia
इंडियन प्रीमियर लीगचा २०१६ हंगाम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल २०१६ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. सदर स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख २०१६ची आयपीएल स्पर्धा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, २०२० इंडियन प्रीमियर लीग.
जलद तथ्य २०१६ इंडियन प्रीमियर लीग, व्यवस्थापक ...
२०१६ इंडियन प्रीमियर लीग | |||
---|---|---|---|
![]() | |||
व्यवस्थापक | बीसीसीआय | ||
क्रिकेट प्रकार | २०-२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | दुहेरी साखळी सामने आणि प्ले ऑफ | ||
यजमान |
![]() | ||
विजेते | सनरायझर्स हैदराबाद (१ वेळा) | ||
सहभाग | ८ | ||
सामने | ६० | ||
मालिकावीर | विराट कोहली (बंगळूर) | ||
सर्वात जास्त धावा | विराट कोहली (९७३) | ||
सर्वात जास्त बळी | भुवनेश्वर कुमार (२३) | ||
अधिकृत संकेतस्थळ | www.iplt20.com | ||
|
बंद करा
२९ मे २०१६ रोजी एम. चिन्नास्वामी मैदान, चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला पराभूत करून विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला. सनरायझर्स हैदराबादचे हे पहिलेच आयपीएल विजेतेपद.
अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार सनरायझर्स हैदराबादच्या बेन कटिंग ह्याला देण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहलीला स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादच्याच, मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल २०१६चा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.