जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ (आहसंवि: IAH, आप्रविको: KIAH, एफ.ए.ए. स्थळसूचक: IAH) हा अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
जॉर्ज बुश आंतरखंडीय विमानतळ George Bush Intercontinental Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: IAH – आप्रविको: KIAH | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | ह्यूस्टन महापालिका | ||
प्रचालक | ह्यूस्टन विमानतळ प्रणाली | ||
कोण्या शहरास सेवा | ह्यूस्टन | ||
स्थळ | ह्यूस्टन | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ९७ फू / ३० मी | ||
गुणक (भौगोलिक) | 29°59′04″N 095°20′29″W | ||
संकेतस्थळ | www.fly2houston.com/iah | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१५एल/३३आर | १२,००१ | ३,६५८ | सिमेंट |
15आर/३३एल | ९,९९९ | ३,०४८ | सिमेंट |
९/२७ | १०,००० | ३,०४८ | सिमेंट |
८एल/२६आर | ९,००० | २,७४३ | सिमेंट |
८आर/२६एल | ९,४०२ | २,८६६ | सिमेंट |
ह्यूस्टन शहराच्या उत्तरेस २० मैल (३२ किमी)[1][2] असलेला हा विमानतळ ह्यूस्टन खेरीज शुगरलॅंड-बेटाउन उपनगरांनाही सेवा पुरवतो. १०,००० एकर (४० किमी²)वर पसरलेला हा विमानतळ डॅलस-फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग टेक्सासमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. याला अमेरिकेच्या ४१व्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशचे नाव देण्यात आलेले आहे.
या विमानतळावरून २०११ साली ४,०१,८७,४४२ प्रवाशांनी ये-जा केली.[3] त्यानुसार हा उत्तर अमेरिकेतील १०व्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ होता. येथे युनायटेड एरलाइन्सचे सगळ्यात मोठे ठाणे असून या विमानकंपनीने येथून १ कोटी ६६ लाख प्रवासी नेले.[4] या विमानतळावर स्पिरिट एरलाइन्सचेही ठाणे आहे.