हैदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता. हैदराबाद शहर हे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हैदराबाद महानगरपालिकेचा भाग ह्या जिल्ह्यामध्ये येतो. हा तेलंगणा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात लहान जिल्हा आहे, परंतु लोकसंख्या घनता जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे.

जलद तथ्य
हैदराबाद जिल्हा
హైదరాబాద్ జిల్లా (तेलुगू)
حيدراباد ضلع (उर्दू)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
Thumb
हैदराबाद जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय हैद्राबाद
मंडळ १६
क्षेत्रफळ
 - एकूण २१७ चौरस किमी (८४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३९,४३,३२३ (२०११)
-लोकसंख्या घनता १८,१७२ प्रति चौरस किमी (४७,०७० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या १००%
-साक्षरता दर ८३.२५%
-लिंग गुणोत्तर १०००/९५४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ 1.हैदराबाद 2.सिकंदराबाद
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ७८६.८ मिलीमीटर (३०.९८ इंच)
प्रमुख महामार्ग रा.म.-४४, रा.म.-६५, रा.म.-१६३, रा.म.-७६५
संकेतस्थळ
बंद करा
Thumb
चारमिनार

इतिहास

ऑपरेशन पोलोनंतर १९४८ मध्ये अत्राफ-ए-बाल्दा जिल्हा आणि बाघाट या हैदराबाद संस्थानातील जिल्ह्यांचे विलीनीकरण करून हैदराबाद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. १९७८ मध्ये हैदराबाद जिल्ह्याचे नंतर हैदराबाद शहरी जिल्हा आणि हैदराबाद ग्रामीण जिल्हा असे विभाजन करण्यात आले. हैदराबाद ग्रामीण जिल्ह्याचे नंतर रंगारेड्डी जिल्हा असे नामकरण करण्यात आले.[1][2]

प्रमुख शहर

भूगोल

हैदराबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ २१७ चौरस किलोमीटर (८४ चौरस मैल) आहे. हैदराबाद जिल्ह्याला रंगारेड्डी आणि मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याच्या सीमा आहेत.

लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या हैदराबाद जिल्ह्याची लोकसंख्या ३९,४३,३२३ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९५४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ८३.२५% आहे. एकूण लोकसंख्येच्या १००% शहरी भागात राहतात.[3]

२०११ च्या जनगणनेत हैदराबाद जिल्ह्याची धार्मिक रचना अशी होती:

अधिक माहिती धर्म, एकूण लोकसंख्येच्या टक्के ...
धर्म एकूण लोकसंख्येच्या टक्के
हिंदू ५१.४५%
मुस्लिम ४३.८९%
ख्रिश्चन २.२२%
जैन ०.५%
शीख ०.२९%
बौद्ध ०.०३%
कोणताही धर्म सांगितला नाही १.५८%
बंद करा
अधिक माहिती लोकसंख्या, ±% दशकातील बदल. ...
लोकसंख्यावाढ
लोकसंख्या ±% दशकातील बदल.
१९०१ ४९९,०८२ —    
१९११ ६२७,७२० +२.३२%
१९२१ ५५६,९१३ −१.१९%
१९३१ ५८८,२१७ +०.५५%
१९४१ ८१०,७९० +३.२६%
१९५१ १,०८३,६३४ +२.९४%
१९६१ १,१९१,६६८ +०.९५%
१९७१ १,६८२,२८४ +३.५१%
१९८१ २,२५१,००९ +२.९६%
१९९१ ३,१४५,९३९ +३.४०%
२००१ ३,८२९,७५३ +१.९९%
२०११ ३,९४३,३२३ +०.२९%
बंद करा
अधिक माहिती वर्ष, प्रमाण ...
१९८१-२०११ मुस्लिमांचे प्रमाण
वर्ष प्रमाण
१९८१ ३५.९१
१९९१ ३९.३५
२००१ ४१.१७
२०११ ४३.४५
बंद करा

मंडळ (तहसील)

हैदराबाद जिल्ह्या मध्ये १६ मंडळे आहेत:

अधिक माहिती #, हैदराबाद महसूल विभाग ...
# हैदराबाद महसूल विभाग # सिकंदराबाद महसूल विभाग
अंबरपेठ ११ अमीरपेठ
आसिफनगर १२ खैरताबाद
बहादूरपुरा १३ मरीदपल्ली
बंदलागुडा १४ मुशीराबाद
चारमिनार १५ तिरुमलगिरी
गोवळकोंडा १६ सिकंदराबाद
हिमायतनगर
नामपल्ली
शेखपेठ
१० सैदाबाद
बंद करा

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा


संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.