हिंदू दैवते
From Wikipedia, the free encyclopedia
हिंदू धर्मातील देवता किंवा हिंदू दैवते हे हिंदू धर्म आणि परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जातात. हिंदू संस्कृतीने अनेक देवतावाद स्वीकारला असल्याने विविध स्त्री-पुरुष देवतांची उपासना हिंदू धर्मात केली जात असल्याचे दिसून येते.[1] हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त, लिंगायत अशा पंथांच्या माध्यमातून अनुक्रमे शंकर, विष्णू, गणपती, देवी अशा मुख्य देवता आणि त्यांच्या परिवारातील उपदेवता यांची उपासना केली जाते.[2]