जपानमधील द्रुतगती रेल्वे मार्ग From Wikipedia, the free encyclopedia
सॅन्यो शिनकान्सेन (जपानी: 山陽新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. १९७२ सालापासून कार्यरत असलेला व ५५४ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग पश्चिम जपानमधील ओसाका व फुकुओका ह्या प्रमुख शहरांना जोडतो. तसेच तोकाइदो शिनकान्सेन मार्गाद्वारे फुकुओकापासून थेट राजधानी तोक्यो शहरापर्यंत प्रवास करता येतो. तसेच फुकुओका रेल्वे स्थानकावरून क्युशू शिनकान्सेनमार्गाद्वारे कागोशिमा ह्या जपानच्या नैऋत्य टोकावरील शहरापर्यंत जलद रेल्वेप्रवास शक्य आहे.
सॅन्यो शिनकान्सेन | |||
---|---|---|---|
एन७००ए प्रणालीची शिनकान्सेन गाडी | |||
स्थानिक नाव | 山陽新幹線 | ||
प्रकार | शिनकान्सेन | ||
प्रदेश | जपान | ||
स्थानके | १९ | ||
कधी खुला | १५ मार्च १९७२ | ||
चालक | पश्चिम जपान रेल्वे कंपनी | ||
तांत्रिक माहिती | |||
मार्गाची लांबी | ५५३.७ किमी (३४४ मैल) | ||
गेज | १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज | ||
विद्युतीकरण | २५ किलोव्होल्ट एसी | ||
कमाल वेग | ३०० किमी/तास | ||
|
सॅन्यो शिनकान्सेन मार्ग जपानच्या ओसाका, ह्योगो, ओकायामा, हिरोशिमा, यामागुची व फुकुओका ह्या राजकीय प्रदेशांमधून धावतो व जपानमधील खालील प्रमुख शहरांना जोडतो.
आजच्या घडीला सॅन्यो शिनकान्सेनवर १६ डबे असलेल्या ७०० प्रणालीच्या रेल्वेगाड्या वापरण्यात येतात. ह्या गाडीचा कमाल वेग ३०० किमी/तास इतका असून वळणावर देखील ही गाडी २७० किमी/तास इतक्या वेगाने जाऊ शकते. ह्यामुळे नोझोमी ही सर्वाधिक गतीची रेल्वेगाडी तोक्यो ते फुकुओकादरम्यानचे अंतर केवळ ५ तासांत पार करते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.