सूक्त
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
सूक्त म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितले गेलेले.[1]
वेदांमध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. वेदांतील विशिष्ट देवतांची स्तुती करणाऱ्या ऋचांचा वा तत्सम मंत्रांचा समुच्चय म्हणजे सूक्त.
वैदिक मंत्रांचा असा विशिष्ट मंत्र-समूह जो 'एकदैवत्य' आणि 'एकार्थ' असेल, त्यालाच सूक्त म्हणले जाते. [1]
'बृहद्देवता' नामक ग्रंथात सूक्त शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली गेली आहे.
संपूर्णं ऋषिवाक्यं तु सूक्तमित्यभिधीयते |अर्थात संपूर्ण ऋषि-वचनांना सूक्त असे संबोधतात.[2]
'बृहद्देवता' ग्रंथात चार प्रकारच्या सूक्तांचे वर्णन केले गेले आहे.
१. देवता सूक्त - ज्यात कोणा एकाच देवतेची स्तुती केलेली असते.
२. ऋषि सूक्त - ज्यात कोणा एकाच ऋषींची स्तुती केलेली असते.
३. अर्थ सूक्त - ज्या सूक्ताच्या पठणाने सकल हेतूंची पुरती होते.
४. छंदः सूक्त - जी सूक्ते एकाच प्रकारच्या छंदात मांडली गेली आहेत.
सुक्तांची विभागणी सामान्यतः पुढील दोन प्रकारांतदेखील केली जाते,[3]
१. क्षुद्रसूक्त - ज्यात कमीतकमी ३ ऋचा असतात.
२. महासूक्त - ज्यात ३हून अधिक ऋचा असतात.
वेदांमध्ये विविध देवतांवर केलेल्या अशा अनेक स्तुतीपर सूक्तांचा अंतर्भाव आहे.
उदाहरणार्थ -
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.