सुवोन
From Wikipedia, the free encyclopedia
सुवोन (कोरियन: 수원) ही दक्षिण कोरिया देशाच्या ग्याँगी प्रांताची राजधानी आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले सुवोन शहर सोलच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे. १७ विद्यापीठांचे परिसर असलेले सुवोन दक्षिण कोरियामधील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे.
जलद तथ्य
सुवोन 수원 |
|
दक्षिण कोरियामधील शहर | |
गुणक: 37°16′N 127°1′E |
|
देश | ![]() |
प्रांत | ग्याँगी |
क्षेत्रफळ | १२१.१ चौ. किमी (४६.८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ११,६०,०६२ |
- घनता | ८,९७५ /चौ. किमी (२३,२५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ९:०० |
seogwipo.go.kr |
बंद करा
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/f/fb/Bifyu_8.jpg/640px-Bifyu_8.jpg)
२००२ फिफा विश्वचषकादरम्यान दक्षिण कोरियामधील १० यजमान शहरांपैकी सुवोन एक होते. येथील सुवोन विश्वचषक मैदानामध्ये विश्वचषकामधील ४ तर २००१ फिफा कॉन्फेडरेशन चषकामधील ३ सामने खेळवले गेले होते.