सुधा मूर्ती
भारतीय लेखक, परोपकारी, लेखक (जन्म १९५०) / From Wikipedia, the free encyclopedia
सुधा कुळकर्णी-मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात.[1] संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत.[2] सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.
सुधा कुलकर्णी याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य सुधा कुळकर्णी-मूर्ती, जन्म ...
सुधा कुळकर्णी-मूर्ती | |
---|---|
जन्म |
१९ ऑगस्ट १९५० शिगगाव, कर्नाटक |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | अभियंता |
प्रशिक्षणसंस्था | बी.व्ही. भूमराद्दी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (बीव्हीबीसीईटी) |
पेशा | सामाजिक कार्य, अभियंत्रिकी, लेखिका |
जोडीदार | एन.आर. नारायण मूर्ती |
अपत्ये | रोहन मूर्ती (मुलगा), अक्षता मूर्ती (मुलगी). |
नातेवाईक | ऋषी सुनक (जावई) |
पुरस्कार |
• पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००६), |
बंद करा
जलद तथ्य मागील, मतदारसंघ ...
विद्यमान | |
पदग्रहण ८ मार्च २०२४ | |
मागील | रिक्त |
---|---|
मतदारसंघ | राष्ट्रपतीद्वारा मनोनित |
बंद करा