रामायणानुसार सुग्रीव (संस्कृत:सुग्रीव, मलाय आणि जावा भाषा: सुग्रीव, थाई भाषा: सुग्रीप, लाओ भाषा: सुगीप किंवा संग्किप, ख्मेर भाषा: सुख्रीब, क्रिओल भाषा: सूग्रिम, तमिळ: कुक्किरिवन, बर्मी भाषा: थुग्यीक) हा वानरांचा म्होरक्या व वानरांच्या किष्किंधा नामक राज्याचा राजा होता. हा सूर्याचा पुत्र व वानरराज वालीचा धाकटा भाऊ होता. प्रसंगोपात उद्भवलेल्या गैरसमजातून वाली व याच्यात वैर निर्माण झाले. वालीने याला किष्किंधेतून हाकून लावले व याच्या पत्नीचे, अर्थात रुमेचे हरण केले. पुढे रामाच्या साहाय्याने याने वालीचा निप्पात केला व वालीपश्चात हा किष्किंधेचा राजा बनला. वालीस वधण्याच्या कामी व राज्यप्राप्तीसाठी साहाय्य केल्याबद्दल कृतज्ञ राहून याने आपल्या वानरसेनेसह राम-लक्ष्मणांना रावणाच्या तावडीतून सीतेची सुटका करण्यासाठी साहाय्य केले.

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
बंद करा
रामलक्ष्मण यांच्यासह सल्लामसलत करणारा सुग्रीव (चित्रनिर्मितिकाळ: अंदाजे इ.स. १६९० - इ.स. १७२० यांदरम्यान)

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.