From Wikipedia, the free encyclopedia
सादिक अमन खान (८ ऑक्टोबर, १९७०:टूटिंग, लंडन, युनायटेड किंग्डम - ) हे लंडनचे महापौर आहेत. हे २०१६ पासून या पदावर आहेत. या आधी ते २००५-१६ दरम्यान टूटिंगचे खासदार होते. हे लेबर पार्टीचे सदस्य आहे आणि स्वतःला सामाजिक लोकशाहीवादी म्हणवतात.
खान यांचा जन्म दक्षिण लंडन मधील टूटिंग येथे ब्रिटिश पाकिस्तानी झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ लंडनमधून कायद्याची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी मानवाधिकार समस्यांमध्ये तज्ज्ञ वकील म्हणून काम केले २००५ मध्ये ते लेबर पार्टीचे सदस्य झाले आणि २००५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत टूटिंगचे खासदार म्हणून निवडून आले. यापूर्वी ते १९९४-२००५ या काळात वँड्सवर्थ बरोचे नगरसेवक होते. २००३ चे इराकवरील आक्रमण आणि नवीन दहशतवादविरोधी कायद्यांसह मजूर पक्षाचे पंतप्रधान टोनी ब्लेर यांच्या अनेक धोरणांवर त्यांनी उघडपणे टीका केली. ब्लेरच्या उत्तराधिकारी गॉर्डन ब्राउनच्या मंत्रीमंडळात २००८मध्ये त्यांना पद देण्यात आले. ते काही काळासाठी परिवहन राज्यमंत्री होते. खान हे एड मिलिबँड यांचे प्रमुख सहयोगी आहेत. त्यांनी मिलिबँडच्या शॅडो कॅबिनेटमध्ये लंडनचे छाया मंत्री आणि इतर पदांवर काम केले होते.
२०१६ंमध्ये सादिक खान ५७% मते मिळवून लंडनचे महापौर झाले. हे लंडनचे तिसरे महापौर आणि पहिले मुस्लिम महापौर आहेत. [1] [2] निवडणुकीच्या निकालांना विलंब झाल्यामुळे, त्यांनी अधिकृतपणे 9 मे रोजी पदभार स्वीकारला. [3]
खानने १९९४मध्ये सादिया अहमद यांच्याशी लग्न केले. सादिया सुद्धा खान प्रमाणे वकील आहेत. त्यांना दोन मुली आहेत, [4] [5] सादिक खान लिव्हरपूल एफसीचे समर्थक आहेत. [6]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.