रामचंद्र गणेश कुंदगोळकर
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे एक गायक / From Wikipedia, the free encyclopedia
सवाई गंधर्व (१९ जानेवारी १८८६, २ सप्टेंबर १९५२) हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. त्यांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य रामचंद्र गणेश कुंदगोळकर, उपाख्य ...
रामचंद्र गणेश कुंदगोळकर | |
---|---|
सवाई गंधर्व | |
उपाख्य | सवाई गंधर्व |
आयुष्य | |
जन्म | १९ जानेवारी १८८६ |
जन्म स्थान | कुंदगोळ, (धारवाड), कर्नाटक, भारत |
मृत्यू | १२ सप्टेंबर १९५२ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी, कन्नड |
पारिवारिक माहिती | |
वडील | गणेश कुंदगोळकर |
संगीत साधना | |
गुरू | उस्ताद अब्दुल करीम खॉं |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग, |
घराणे | किराणा घराणे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
बंद करा
रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीत सामील झाले आणि थोड्याच काळात मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण श्रीपाद राजहंस यांना ज्याप्रमाणे लोक बालगंधर्व म्हणून ओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली आहेत.