सांस्कृतिक आणि निसर्गरम्य शहर From Wikipedia, the free encyclopedia
सफाळे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गाव आहे. येथील कोरे वर्तक पुळण आणि एडवण आशापुरी मंदिर ही पर्यटनस्थळे आहेत. सफाळे रेल्वे स्थानक मुंबई-वडोदरा रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे फक्त कमी वेगाच्या गाड्या थांबतात.
एकूणच सांस्कृतिकदृष्टया महत्त्वाचे शहर म्हणून उदयास येत आहे. महत्त्वाचे म्हणजे येथे अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अंतरंग सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाळे ही एक महत्त्वाची सेवाभावी सामाजिक संस्था कार्यरत असून विविध उपक्रम आयोजित करीत असते.
अंतरंग[1] ही नॉन-प्रॉफिट संस्था साहीत्य, कला, संस्कृती व पर्यावरण जोपासानेतून सुदृढ समाजाचे निर्माण करणाचे कार्य २०१४ पासून करते आहे. आतापर्यंत साहित्य, संगीत, कला, शिल्प, अभिनय, संस्कृती, पर्यावरण, शैक्षणिक व सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संस्थेचे कार्य अप्रतिम आहे. दर वर्षी दिवाळीच्या आधी होणारा "इंद्रधनू कला महोत्सव" हा या संस्थेचा महत्त्वाचा कार्यक्रम असून, वर्षातून ६ वेळा विविध विषयांतील तज्ञ, अभ्यासक, समाजसेवक, इतिहासकार, संगीतकार इत्यादी पैकी मान्यवरांना बोलावून त्यांच्यासोबत "मुक्तसंवाद" ह्या सदराखाली संवाद साधला जातो. ह्या व्यतिरिक्त वर्षभरात विविध उपक्रमांतर्गत संगीत मैफिल, कवी कट्टा, ढोलताशे संचालन, उन्हाळी शिबीर, व्याख्यान, माहितीपट, अभ्यास सहल, इत्यादी कार्यक्रम होत असतात. अंतरंग प्रतिष्ठान तर्फे सफाळे येथे विनामूल्य ग्रंथालय व अभ्यासिका सुद्धा सुरू केलेली आहे.
सफाळे
येथून ६० कि.मि. अंतरावर डहाणू येथे औष्णिक विद्युत केन्द्र तसेच ३० कि. मि. अंतरावर तारापूर येथे परमाणु विद्युत केन्द्रे आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.