विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/128
From Wikipedia, the free encyclopedia
मराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे ?
- १) मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सर्वसाधारण आणि कायदेविषयक अनभिज्ञता, अनास्था अथवा दुर्लक्षामुळे, विकिमिडीयाची परवाना विषयक निती आणि मराठी विकिपीडिया परवाना विषयक नितीचे अवैध आणि सातत्याने उल्लंघन[1] झाले असण्याची अथवा होत असण्याची शक्यता, कि ज्यामुळे विकिमिडीयास अभिप्रेत http://freedomdefined.org/Definition येथे सूचीत केलेले मुक्त सांस्कृतीक कामाचे मापदंड पूर्ण होत नाहीत.
- २) परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था.
- ३) मराठी विकिपीडियावर पुरेशा परवान्यांचा आणि स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) सारख्या अद्ययावत सुविधांचा अभाव.
- ४) ९९.९९९९९% संचिकांना परवाने नसणे, परवाने त्रुटीयुक्त असणे, परवाने अपुरे असणे, याचा प्रचंड मोठा बॅकलॉग.
- आपल्याला माहित आहे का ? की, मराठी विकिपीडियावरील ९९.९९९ टक्के संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याची गरज आहे. आणि २०,००० हून अधिक संचिका सुविहीत प्रक्रीया केली जाण्याच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.
- ५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.
स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. "असे का?"
- स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. "असे का?"
- १) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमीडिया कॉमन्सवरून चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते
२) कारण विकिमीडिया कॉमन्सवरून चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते.
४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे.
५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.
.