विकिपीडिया:यथादृश्यसंपादक
From Wikipedia, the free encyclopedia
’यथादृश्यसंपादक’ तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअपविषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
- अधून मधून संपादने करून पहाण्यास सुरुवात करण्याच्या दृष्टीने, नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वित करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
सध्या विकिपीडियातील अक्षरांतरण ही पद्धत यथादृश्य संपादकात वापरता येते . तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर गुगल इनपुट टूल्स या विस्तारकासह (extension) यथादृश्यसंपादक वापरू शकता. याखेरीज अन्य पद्धत आपल्याला माहीत असल्यास तिचा येथे उल्लेख करा, जेणेकरून अधिकाधिक नवीन लोकांना यथादृश्यसंपादक वापरता येईल.