अमेरिकन राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
रॉनल्ड विल्सन रेगन (मराठी लेखनभेद: रोनाल्ड विल्सन रेगन ; इंग्लिश: Ronald Wilson Reagan) (फेब्रुवारी ६, इ.स. १९११ - जून ५, इ.स. २००४) हा अमेरिकेचा ४०वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८१ ते २० जानेवारी, इ.स. १९८९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा कॅलिफोर्नियाचा ३३वा गव्हर्नर (इ.स. १९६७ - इ.स. १९७५) होता. राजकारणात प्रवेशण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होता.
रॉनल्ड रेगन | |
कार्यकाळ दिनांक २०-१-१९८१ – ते २०-१-१९८९ | |
उपराष्ट्रपती | जॉर्ज एच.डब्ल्यु. बुश |
मागील | जिमी कार्टर |
पुढील | जॉर्ज एच.डब्ल्यु. बुश |
जन्म | ६ फेब्रुवारी, १९११ टँपिको, इलिनॉय, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष(१९६२ ते २००४), डेमोक्रॅटिक पक्ष(१९३२ ते १९६२) |
पत्नी | जेन वेमन (१९४०-१९४८) न्यान्सी डेव्हीस (१९५१ - २००४) |
गुरुकुल | युरेका महाविद्यालय |
धर्म | ख्रिश्चन |
सही |
रेगन शिक्षणाने अर्थशास्त्र व समाजशास्त्र विषयांचा पदवीधर होता. पदवी मिळवल्यानंतर तो प्रथम आयोवा येथे रेडिओवर रुजू झाला. इ.स. १९३७मध्ये तो कॅलिफोर्नियात लॉस एंजेल्स येथे हलला. तेथे त्याने अभिनयास सुरुवात केली. अनेक चित्रपटांमधून व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून साकारलेल्या भूमिकांमुळे त्याला लोकप्रियता लाभली. इ.स. १९६२ साली तो रिपब्लिकन पक्षात प्रवेशला. इ.स. १९६४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींत बॅरी गोल्डवॉटर याच्या समर्थनार्थ त्याने केलेले प्रेरणादायक भाषण ऐकून रिपब्लिकन पक्षाने त्याला कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदासाठी उभे केले. तो दोनदा या पदावर निवडून आला. तो इ.स. १९६८ व इ.स. १९७६ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीचे नामांकन मिळवण्यात अपयशी ठरला, तरीही इ.स. १९८० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत पक्षाकडून उमेदवारीचे नामांकन मिळवण्यात तो यशस्वी झाला. अध्यक्षीय निवडणुकींत त्याने त्या वेळचा विद्यमान अध्यक्ष व डेमोक्रॅट उमेदवार जिमी कार्टर याला हरवून निवडणूक जिंकली.
त्याच्या पहिल्या अध्यक्षीय मुदतीत अमेरिकेने ग्रेनेड्यावर आक्रमण केले. देशांतर्गत आघाडीवर चलनवाढ रोखण्यासाठी रेगन प्रशासनाने वित्तपुरवठ्यावर नियंत्रण राखले, आर्थिक वाढीस चालना देण्याकरता कर घटवले, शासकीय खर्चात कपात केली. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीत त्याने सोव्हिएत संघाचा शासनप्रमुख मिखाइल गोर्बाचेव याच्यासह मध्यम पल्ल्याच्या आण्विक शस्त्रांचा तह घडवून आणण्यासाठी वाटाघाटी केल्या. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत शीतयुद्धाची अखेर झाली.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.