मानवी समाज आणि त्याची उत्पत्ती, विकास, संस्था आणि संस्था यांचा वैज्ञानिक अभ्यास From Wikipedia, the free encyclopedia
समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.[1] सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.[2] यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रूप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.
व्यवस्थाबद्द ज्ञान समुच्चयास शास्त्र असे म्हणतात. अभ्यास विषयाच्या आधारे शास्त्राचे दोन प्रकार केले जातात. १) नैसर्गिक २) सामाजिक शास्त्र.
नैसर्गिक विज्ञानात समाजोत्तर घटनांचे अध्ययन केले जाते. यामध्ये रासायनिक प्रक्रिया, वनस्पती, उर्जा इ. विषयांचे अध्ययन करण्यात येते. या विषयांचे अध्ययन करण्यासाठी पदार्थ विज्ञान, वनस्पती शास्त्र, रसायनशास्त्र, इ. शास्त्रांचा समावेश केला जातो.
सामाजिक शास्त्रांचा अभ्यासविषय सामाजिक घटना असतात. उदा. सामाजिक संबंध, आर्थिक प्रयत्न, मानसिक वर्तन, राजकीय वर्तन इ. अभ्यास समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इ. शास्त्रामध्ये करण्यात येतो.
थोडक्यात म्हणजे सामाजिक घटनांच्या अभ्यासाशी निगडित असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात.
शास्त्राच्या अभ्यास विषयाला केंद्रस्थानी मानले असताना शास्त्राचे आदर्शनिष्ठ शास्त्र, आणि विषुद्धशास्त्र असेही दोन प्रकार करता येतात.
आदर्श प्रमाणभूत मानून अध्ययन करणारी शास्त्रे म्हणजे तर्कशास्त्र व नीतिशास्त्र ही होय. याउलट समाजातील घटनांचा तटस्थ वृत्तीने अभ्यास करणारी शास्त्रे म्हणजे विशुद्ध शास्त्रे होय. समाजशास्त्रात तटस्थ वृत्तीने समाजातील घटनांचा अभ्यास केला जात असल्याने ते एक विशुद्ध शास्त्र आहे.
समाजशास्त्राचा आरंभाचा काळ लक्षात घेता असे स्पष्ट होते की ते एक आधुनिक शास्त्र असे इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इ. शास्त्रांना जसा दीर्घ इतिहास आहे. तसा दीर्घ इतिहास समाजशास्त्राला नाही. समाजशास्त्राची वाटचाल 150-175 वर्षांची आहे. परंतु, या शास्त्राचा अभ्यासविषय मानवी समाजाइतकाच प्राचीन आहे.
समाजाचे अध्ययन प्राचीन काळापासून पाश्चिमात्य व इतर देशात करण्यात येत होते. यासंबंधी अनेक पुरावे उपलब्ध आहेत.
1. ग्रीक देशात प्लेटो व ॲरीस्टाॅटल यांनी रिपब्लिक व पाॅलिटिक्स हे ग्रंथ लिहीले. या ग्रंथात समाज, राज्य व कायदा याविषयी सविस्तर विश्लेषण आहे.
2. रोमन तत्त्वज्ञा सिसेरी यांनी हा ग्रंथ व मॅकवेलचा या ग्रंथात समाज जीवनावर प्रकाश टाकला आहे.
3. भारतात देखील वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायण इ. समावेश होतो. यामध्ये समाज जीवन लोक व्यवहार संकेत, संस्कार आणि आचार संहिता यांचे स्पष्टीकरण आढळते. कौटिल्याचा ‘अर्थशास्त्र’ व शुक्राचार्यांनी लिहिलेला ‘नितीसार’ या ग्रंथात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थव्यवस्था व समाजजीवनाचे चित्रण केलेले आहे. तसेच जैन व बौद्ध धर्मियांच्या साहित्यात तत्कालीन समाज वर्तनाचे दर्शन घडते.
4. भारतात देखील वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, रामायण इ. समावेश होतो. यामध्ये समाज जीवन लोक व्यवहार संकेत, संस्कार आणि आचार संहिता यांचे स्पष्टीकरण आढळते. कौटिल्याचा ‘अर्थशास्त्र’ व शुक्राचार्यांनी लिहिलेला ‘नितीसार’ या ग्रंथात राज्यसंस्था, धर्मसंस्था, अर्थव्यवस्था व समाजजीवनाचे चित्रण केलेले आहे. तसेच जैन व बौद्ध धर्मियांच्या साहित्यात तत्कालीन समाज वर्तनाचे दर्शन घडते.
समाजशास्त्राचा आरंभ
बहुतांश देशात प्राचीन काळात समाजाचे अध्ययन करण्यात येत होते असे प्रतिपादन केले असले तरी खऱ्या अर्थाने समाजाच्या अध्ययनाची शास्त्रीय दृष्टीने सुरुवात मागील शतकापासून झाली.
इ.स. 1839 मध्ये फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आगस्तकाँन याने ही संज्ञा सर्व प्रथम उपयोगात आणली. ही संज्ञा (सोसिअस) या लॅटिन आणि ष्स्वहवेष् (लोगाॅस) या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. यातील या शब्दाचा अर्थसोबती व स्वहवे या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होता. एकूण म्हणजे संगतीचे किंवा सोबतीचे पर्यायाने समाजाचे शास्त्र होय. आगस्ट कौन ने ही संज्ञा उपयोगात आणण्यापूर्वी समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र हे भौतिक शास्त्राप्रमाणे स्वतंत्र शास्त्र असावे या हेतूने सामाजिक भौतिक ही संज्ञा वापरली. परंतु पुढे घटनांच्या अध्ययनासाठी कितपत तंतोतंत उपयोगात आणता येतील असा प्रश्न निर्माण झाल्या कारणाने त्यांच्या ऐवजी ही संज्ञा वापरली. आणि तेव्हापासून समाजाचे शास्त्र म्हणून असा शब्द उपयोगात आणला गेला.
आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा पाश्चात्य जगात वापर केला होता. भारतात आणि चीन देशात हा वापर आधीपासूनच होता.
१. लेस्टर वार्डः
‘समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे’ प्रस्तुत व्याख्येत वार्ड ने समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून ‘समाजाचा उल्लेख’ केलेला आहे. परंतु समाजातील कोणत्या अंगाचे आणि कोणत्या रितीने अध्ययन केले पाहिजे यासंबंधी संकेत दिलेला नाही.
२. फ्रॅन्कलीन गिडिंगजः
समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते.
वरील परिभाषेत संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या अध्ययन करण्यात येते असे सुचविले आहे.
३. आगबर्न व निमकाॅकः
”समाजजीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रास समाजशास्त्र असे म्हणतात.“
येथे समाजाचे शास्त्रीय रितीने अध्ययन केले पाहिजे. हे नमूद करताना अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याची गरज प्रधान मानली आहे.
४. मॅक आयव्हर व पेजः
समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध आहे.
५. मार्षल जोन्सः
समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवांशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो.
६. हॅरी जाॅन्सनः
समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास करण्यात येतो.
७. मॅक्स वेबरः
समाजशास्त्र हे असे विज्ञान आहे की, ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वाचनात्मक आकलनाचा प्रयत्न करण्यात येतो.
८. अल्केष इकेल्सः
समाजशास्त्रात सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारंपारिक संबंधाचा अभ्यास केला जातो.
वर सांगितलेल्या व्याख्येवरून समाजशास्त्राचा अध्ययनविषयाबाबत खालील घटक स्पष्ट करण्यात येतात.
अ. मानवी समाजाचे अध्ययन. ब्. सामाजिक संबंधाचे अध्ययन. क्. सामाजिक समूहाचे अध्ययन. ड्. सामाजिक क्रियांचे अध्ययन.
१. मानवी समाजाचे अध्ययनः
समाजशास्त्रा संपूर्ण मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे. समाजशास्त्रात समाजाच्या कोणत्याही एका अंगाचे अध्ययन केले म्हणजे समाजाचे संपूर्ण आकलन होऊ शकत नाही. संस्था किंवा समूह हे घटक स्वतंत्र नसतात ते परस्पर संबंधित व परस्पर अवलंबित असतात. त्यामुळे कोणताही अभ्यास करताना सर्व घटकांचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यासविषय संपूर्ण मानवी समाज असला पाहिजे.
२. सामाजिक संबंधाचा अभ्यासः
काही अभ्यासकांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यासविषय सामाजिक संबंध असला पाहिजे कारण त्यांच्या मते मानवी समाज व्यक्ती, व्यक्ती मिळून बनलेला असतो. सर्व व्यक्ती एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, संबंधित असतात. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. त्यामुळे समाजशास्त्रात संबंधांचा अभ्यास झाला पाहिजे.
३. सामाजिक समूहांचे अध्ययनः
जाॅन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजशास्त्र अभ्यासविषय सामाजिक समूहांचे अध्ययन असावे. त्यांच्यामते समाज हा एक विशाल समूह आहे. या समूहात अनेक उपसमूह असतात. हे समूह परस्परांशी संबंधित असतात. समाजातील सभासद आपल्या सर्व जीवनावश्यक गरजा एकट्याने भागवू शकत नाहीत. त्यांना एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागते. यासाठी ते एकत्र येतात. आणि समूहाची निर्मिती होते. म्हणून समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास झाला पाहिजे.
४. सामाजिक क्रियांचे अध्ययनः
मॅक्स वेबर व इतर समाज शास्त्रज्ञानानुसार समाजशास्त्राचा अभ्यासविषय सामाजिक क्रिया असला पाहिजे. सामाजिक जीवनात सामाजिक क्रिया मध्यवर्ती असतात. ज्याप्रमाणे मूलद्रव्यात ‘परमाणू’ जसा लहानात लहान असून देखील अर्थपूर्ण असतो. त्याप्रमाणे सामाजिक क्रिया महत्त्वाच्या असतात.
वरील बाबींवर समाजशास्त्रात अभ्यास करण्यात यावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
अल्केस इंकेलस यांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाविषयीचे ठळक भागात विभाजन केले आहे.
1. समाजशास्त्रीय विश्लेषणः
मानव संस्कृती आणि समाज सामाजिक दृष्टीकोन वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन.
2. समाजातील प्राथमिक घटकः
सामाजिक क्रिया आणि सामाजिक संबंध, व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, समूह, समुदाय, मंडळे, आणि संघटन इ. अध्ययन.
3. मूलभूत सामाजिक संकल्पनाः
कुटूंब, आर्थिक, राजकीय, धार्मिक शैक्षणिक, न्याय इ. विषयीचे अध्ययन.
दोन संप्रदाय
1) विशेषात्मक संप्रदाय 2) समन्वयात्मक संप्रदाय
विषेशात्मक संप्रदायाचे प्रमुख प्रणेते आहेत जाॅर्ज सिमेल, विरकांत, वाॅनविज, टाॅनिज, मॅक्स वेबर.
या संप्रदायाच्या अभ्यासकांनी समाजशास्त्राला स्वतंत्र अभ्यास विषय आहे हे पटवून सांगण्याचा स्वरूपाचे अध्ययन कोणत्याही सामाजिक शास्त्रात केले जात नाही. म्हणून तो एक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास आहे.
1. सिमेलः
समाजशास्त्रात सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचा अभ्यास केला पाहिजे. त्यातील अंतवस्तूचा ;ब्वदजमदजद्ध अभ्यास करण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे भूमिती म्हणजे फक्त लांबी, रुंदी, उंची, इ.चे मापन करतो. त्या वस्तूमध्ये काय आहे. याचा विचार करत नाही. तसेच सामाजिक संबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणे आपले उद्दिष्ट असले पाहिजे.
येथे सिमेल यांनी भूमितीतील अध्ययन पद्धतीप्रमाणे सामाजिक संबंधाच्या स्वरूप व अंतर्वस्तूत भेद केला आहे. अंतर्ववस्तूचा स्वरूपावर परिणाम होत नाही. त्यांच्यामते समाजातील संबंधाचे सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, प्रभुत्व, अधीनता इ. अभ्यासणे आवश्यक आहे. परंतु ते कोणत्या क्षेत्रात निदर्शनास येतात हे पाहणे आवश्यक नाही. या प्रक्रिया, आर्थिक, धार्मिक, राजकीय, इ. क्षेत्रात दिसून येतील परंतु त्याला महत्त्व न देता फक्त स्वरूपावर लक्ष केंद्रित करावे. या पद्धतीने मानवी समाजाचे अध्ययन होऊ शकते.
2. विरकांत:
विरकांत या अभ्यासकाने देखील स्वरूपात्मक विचारसरणीचा पुरस्कार केलेला आहे. त्यांच्या मते समाजशास्त्र हे स्वायत्त शास्त्र झाले पाहिजे. तसेच सामाजिक संबंधाबरोबर मानसिक संबंधांचा देखील अभ्यास या विषयात करावा कारण सर्व सामाजिक संबंधाच्या मुळाशी मानसिक संबंध असतात. यश, प्रेम, मत्सर, द्वेष, घृणा, सन्मान इ. मानसिक बाजूंवर व्यक्ती-व्यक्तीतील संबंध आधारित असतात.
3. वाॅन विजे:
वाॅन विजे या अभ्यासकांनी देखील सामाजिक संबंधाचे स्वरूप समाजशास्त्राचा अभ्यास विषय असला पाहिजे असे वाटते. सामाजिक संबंधामुळेच समाज निर्माण होतो. हे संबंध अनेक प्रकारचे असतात. वाॅन विजे यांनी संबंधाचे 650 प्रकार सांगितले आहे. हे संबंध व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समूह, समूह-समूह या बरोबर आर्थिक, धार्मिक, राजकीय, व अन्य प्रकारचे आहेत.
4. टाॅनिजः
टाॅनिज या जर्मन समाजशास्त्राने सामाजिक संबंधाच्या स्वरूपावर आधारित समुदाय आणि मंडळ असा भेद केला आहे. समुदायातील मध्यस्थींच्या संबंधाचा आधार भावनात्मक बंध आणि नातेगिरी असतो तर मंडळातील व्यक्तीचे संबंध अवैयक्तिक स्वरूपाचे असतात. अशा प्रकारे समाजशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र झाले पाहिजे व त्याचा अभ्यासविषय इतर शास्त्रांचा असू नये या विचारांचे समर्थन वरील अभ्यासकांनी केले आहे.
टिकाः
1. अभ्यास विषयावर मर्यादा पडली आहे.
2. सामाजिक संबंधाचे अध्ययन ही बाब फक्त समाजशास्त्राच्या अभ्यासाइतकीच मर्यादित नाही. इतर सामाजिक शास्त्रात सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. राज्य शास्त्रात आंतरराष्ट्रीय करणे अपरिहार्य आहे.
3. समाजशास्त्रात अंतर्वस्तुला वगळून अभ्यास करणे शक्य नाही. कारण अंतर्वस्तुचा स्वरूपावर परिणाम होणे अगदी अपरिहार्य असते.
4. आधुनिक काळात कोणतेही शास्त्र पूर्णता स्वतंत्र आहे असे म्हणता येत नाही. सर्व शास्त्रांमध्ये संकल्पना आणि सिद्धांताची पर्यायाने ज्ञानाची देवाण-घेवाण चाललेली असते. कोणताही अभ्यासपूर्ण स्वतंत्र नसतो.
समाजशास्त्राच्या व्याप्ती संबंधी निश्चित भूमिका घेणारा संप्रदाय म्हणजे समन्वयात्मक संप्रदाय होय. समन्वयात्मक संप्रदायाच्या समर्थकांचे मत हे शास्त्र सामान्य शास्त्र झाले पाहिजे. समाजशास्त्राच्या अभ्यासविषयाबाबत संकुचित भूमिका स्वीकारता येणार नाही. फक्त सामाजिक संबंधाचा अभ्यास केला तर विषयाचा विकास होणार नाही. यासाठी अभ्यासविषय व्यापक असावा म्हणून समाजशास्त्रात मानवी जीवनाचे सर्वांगीण अध्ययन केले पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक जीवनाचे अध्ययन करणारे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, इ. विशेष मानवी शास्त्रे आहेत. ह्या शास्त्रात समाज जीवनासंबंधी शास्त्रीय रितीने एकत्रित केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजशास्त्रज्ञांनी करणे उपयुक्त आहे.
लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी आर्थिक, भौगोलिक समाजशास्त्र, आर्थिक इ. शास्त्रांचा अभ्यास केला जातो. या संप्रदायांचे मुख्य प्रणेते व त्यांचे विचार खालील प्रमाणे आहे.
1.एमिल डुरखाईमः
डुरखाईमने समाजशास्त्राच्या व्याप्तीस तीन भागात विभागले आहे.
1) सामाजिक आकारशास्त्र: या भागात मानवी समाज जिवाचा भौगोलिक आधार, लोकसंख्या, लोकसंख्या रचना इ. घटकांचे अध्ययन करण्यात येते.
2) सामाजिक शरीरशास्त्र: समाजातील धार्मिक, आर्थिक, राजकीय व अन्य अंगाचे अध्ययन सामाजिक शरीरशास्त्रात केले जाते. वर्तमान काळात या भागांचा अभ्यास करणारी शास्त्रे निर्माण झाली आहेत. धर्माचे समाजशास्त्र, आर्थिक समाजशास्त्र इ.
3) सामान्य समाजशास्त्र: समाज जीवनात घडणाऱ्या घटनांचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करून त्या आधारे सामान्य नियम व सिद्धांताची मांडणी करणे.
2. गिन्सबर्ग
1. सामाजिक आकारशास्त्रः
या शाखेत समाजरचनेत समाविष्ट होणाऱ्या लोकसंख्या, सामाजिक समूह, सामाजिक संस्था इ. घटकांचे अध्ययन करण्यात येते.
2. सामाजिक नियंत्रणः
सामाजिक नियंत्रण प्रक्रियेत नियंत्रणाची साधने असणाऱ्या धर्म, नीती, प्रथा व परंपरा कायदा तसेच अन्य साधनांचा अभ्यास करण्यात येतो.
3. सामाजिक प्रक्रियाः
समाजात सातत्याने निदर्शनास येणाऱ्या संघटनात्मक जसे सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, यांचा सविस्तर अध्ययन करणे.
4. सामाजिक विकृतीशास्त्रः
सामाजिक विघटन आणि सामाजिक समस्यांचे अध्ययन हा सामाजिक विकृती शास्त्राचा अभ्यासविषय मानण्यात येते.
के. डेव्हिस:
डेव्हिसने समाजशास्त्राच्या व्याप्तीचे विवरण देताना एकूण पाच भाग केले आहेत.
1. समाजसंरचनाः उपसमूह, दर्जा, भूमिका, मूल्य, प्रमाणके. इ.
2. सामाजिक कार्येः प्रकार्ये, अपकार्ये, प्रकट व अप्रकट कार्ये. इ. कार्यांचे प्रकार.
3. सामाजिक आंतरक्रियाः सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, एकात्मता इ. प्रक्रियांचा अभ्यास.
4. व्यक्ती आणि समाजः यांच्या परस्पर संबंधांचा विचार.
5. सामाजिक परिवर्तनः परिवर्तनाचे प्रकार गती, दिशा इ.
वरील अभ्यासकांप्रमाणेच हाॅब हाऊस, सोरोकिन सारख्या विचारवंतांनी समन्वयात्मक विचारसरणीचा पुरस्कार केला आहे.
यानुसार समग्र समाजाच्या अभ्यासात समाज शास्त्रज्ञाने उपयोग करून ज्ञानाचे संकलन करावे या दोन्ही विचारसरणीमध्ये कोणती विचारसरणी स्वीकारावी?
समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र
मानवाने आपल्या भोवतालची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जी धडपड केली त्यातून अनेक शास्त्रे विकसित झाली. या शास्त्रांचे प्रमुख दोन प्रकार पडतात.
1. नैसर्गिक शास्त्रे, 2. सामाजिक शास्त्रे
1. नैसर्गिक शास्त्रे:
निसर्गातील (भौतिक) क्षेत्रातील वस्तू इ. अभ्यास करणारी शास्त्रे नैसर्गिक शास्त्रे होय.
उदा. जीव, रसायन, खगोल, पदार्थविज्ञानशास्त्र इ. अशा शास्त्रात मानवी भाव-भावना वर्तन यांचा संबंध नसतो.
वस्तुनिष्ठ, काटेकोरपणे, त्रिकालाबाधित सत्य ठरू शकतील असे नियम प्रस्थापित करणे हेच त्यांचे कार्य असते.
2. सामाजिक शास्त्रे:
मानवा-मानवातील सामाजिक संबंध व परस्परांवर परिणाम करणाऱ्या आंतरक्रियांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो. त्या शास्त्रास सामाजिक शास्त्र म्हणतात.
उदा. मानस, अर्थ, राज्य, मानव, समाजशास्त्र इ. मानवाच्या वर्तनाबद्दल सामान्य नियम प्रस्थापित करण्याचा करत असतात. समाजशास्त्राखेरीज इतर सामाजिक शास्त्रे समाजाचा अभ्यास करतात व ती शास्त्रे विशिष्ट संबंधांचाच अभ्यास करतात म्हणून त्यांना विशिष्ट सामाजिक शास्त्रे असे म्हणले जाते. परंतु समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हणले जाते.
3. समाजशास्त्राची वैज्ञानिक अभ्यास पद्धतः
समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हणले जाते. समाजशास्त्राचा अभ्यासक सामाजिक घटनांबद्दल सर्व सामान्य नियम प्रस्थापित करतो तेंव्हा त्यास वैज्ञानिक अभ्यास पद्धतीच्या अवस्थेतून जावे लागते. त्या पुढीलप्रमाणे.
1. समस्या सूत्रणः
यामध्ये ज्या विषयाचा अभ्यास करायचा तो विषय निश्चित करतो त्यातील प्रश्न निवडून त्याविषयी प्रश्न निर्माण करतो. यामुळे त्या समस्येला निश्चित रूप प्राप्त होते. त्याचे अभ्यासाचे स्वरूप, उद्दिष्ट निश्चित होते. पुढील अभ्यासाची दिशा स्पष्ट होते.
उदा. चित्रपट व गुन्हेगारी संबंध पाहताना चित्रपटाचा गुन्हेगारीला साह्य होते का? अशी समस्या निर्माण केल्यावर अभ्यासाची दिशा स्पष्ट होते. अर्थात एक गोष्ट येथे लक्षात ठेवली पाहिजे की, अभ्यासात समस्येचे हे रूप तसेच राहील का आवश्यकतेनुसार बदलेल किंवा बदलावे लागेल.
2. निरीक्षणः
समस्या निश्चित झाल्यानंतर अभ्यासक त्या समस्येच्या संदर्भातील घटनांचे हेतुपूर्वक शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण करतो. निरीक्षण म्हणजे पाहणे नव्हे. वास्तवातील घटना जशा घडत असतात तशी अभ्यासक नोंद होत असते. निरीक्षण म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा पाया, त्यामुळे तो भक्कम, शास्त्रशुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अभ्यासकाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते यापैकी प्रमुख म्हणजे पुढीलप्रमाणे.
अ) निरीक्षण हे वस्तुनिष्ठ हवे, आवडी-निवडी, मते, संस्कृती, धर्म, देश, जात इ. निरीक्षणावर प्रभाव पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मनात पूर्वग्रह न आणता घटनांचे यथातथ्य, वास्तव, निरीक्षण केले पाहिजे, एखाद्याला (अभ्यासकाला) चित्रपट पाहणे आवडत नसेल व चित्रपटाने गुन्हेगारीला उत्तेजन मिळते अशा पूर्वग्रह तयार झालेला असेल तर त्याने निरीक्षण चुकीचे, अशास्त्रीय ठरेल व पुढचे संशोधन सदोष होईल.
ब) अभ्यासविषयी घटनांचे संकलन केले पाहिजे. तार्किकदृष्ट्या निरीक्षण योग्य हवे नको त्या घटनांचे निरीक्षण योग्य हवे. नको त्या घटनांचे निरीक्षण नको. तसे हव्या त्या घटनेकडे दुर्लक्ष होता कामा नये.
क) निरीक्षण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असते. निरीक्षण अप्रत्यक्ष असेल तर निरीक्षणातील खरेखोटेपणा तपासून पाहून त्या निरीक्षणाचा स्वीकार करावा, निरीक्षणासाठी तज्ञाचे साह्य उपलब्ध होऊ शकते. त्याचा वापर करून घटनांचे संकलन करावे.
3. वर्गीकरणः
निरीक्षणाच्या मार्गाने जी माहिती संकलित केली त्या माहितीचे वर्गीकरण करणे आवश्यक असते. कारण गोळा केलेली माहिती गुंतागुंतीची असते. यातून फारसा अर्थ निष्पन्न होत नाही. तेव्हा ही माहिती सोपी, बोलकी करण्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यासक घटना, व्यक्ती, व्यक्तिविशेष, साम्यभेद इ. निष्कर्षाच्या आधारे त्या माहितीची सुसंवाद विभागणी करतो. घटनांचे कमी-जास्त महत्त्व, घटनातील क्रम, इ. गोष्टी लक्षात येतात.
उदा. गेल्या वर्षी किती चित्रपट प्रकाशित झाले, किती चित्रपटात गुन्हेगारीचा विषय हाताळला आहे. त्याचे प्रमाण किती, किती गुन्हेगार चित्रपट पाहणारे होते. त्यांचे वय, शिक्षण, आर्थिक स्तर, इ. घटनांचे वर्गीकरण केल्यावर त्या घटना अधिक अर्थपूर्ण होतात. त्या लक्षात ठेवणे सोपे जाते.
4. अभ्युपगम:
निरीक्षण केलेल्या घटनांचे वर्गीकरण केल्यावर त्या घटनांचा परस्परांशी संबंध दिसून येतो. त्यांचा क्रम लावता येतो कारण कार्यसंबंध जाणून घेता येतो. कोणती घटना कोणत्या कारणामुळे घडली याचे स्पष्टीकरण देता येते. अशी स्पष्टीकरणात्मक कल्पना अभ्यासकांच्या मनात जेव्हा तयार होते. तेंव्हा तिला अभ्युपगम असे म्हणले जाते.
उदा. गुन्हेगारी चित्रपटातील गुन्ह्यांच्या कल्पना उचलून गुन्हे करण्याचे प्रमाण एकूण गुन्ह्यांच्या प्रमाणाच्या मानाने अल्प आहे. परंतु हे स्पष्टीकरण संभाव्य स्पष्टीकरण असते. अभ्युपगम चुकीचा देखील असण्याची शक्यता असते. त्यासाठी पुढील अवस्थेची गरज असते.5. प्रचिती किंवा पडताळाः
निश्चित समस्येबाबत निरीक्षण, वर्गीकरण केल्यानंतर अभ्यासकाच्या मनात अभ्युपगम तयार होतो. त्याची पुन्हा प्रचिती दिसून येते का नाही. हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ते घटनेचे अंतिम स्पष्टीकरण नसते. अभ्युपगमाविषयी शंका उपस्थित करणे. अभ्युपगमाला पोषक प्रचिती आली तर आपला अभ्युपगम खरा नाही तर चुकीचा मानावा यामुळे अभ्यासकाला पुढे जाता येते. किंवा पाठीमागे वळून पुन्हा नव्याने संशोधन करावे लागते. अभ्युपगमाची प्रचिती लगेच येईल किंवा बरीच वर्षे वाट पाहावी लागते.
6. सामान्यीकरणः
अभ्यासकाने निश्चित केलेल्या समस्येबाबतच्या घटनांचे निरीक्षण, वर्गीकरण, करून त्याआधारे अभ्युपगम तयार केला जातो त्याला त्याची प्रचिती आली की, अभ्यासलेल्या घटनांच्या बाबतीत निश्चित असे सामान्य विधान करू शकतो यालाच सामान्यीकरण म्हणले जाते.
सामान्यीकरण म्हणजे विशिष्ट घटना यांच्यातील कारण कार्य संबंधाबद्दल सर्वत्र लागू पडणारा नियम प्रस्थापित करणे होय. या नियमाला शास्त्रीय आधार असल्याने याला समाजशास्त्रीय नियम म्हणतात.
7. पूर्वकथनः
सामान्यीकरणाने जो नियम प्रस्थापित केला जातो. त्या आधारे विशिष्ट परिस्थितीत भविष्यकाळात काय घडेल याचे निश्चित कथन करता येणे म्हणजे पूर्वकथन होय. पूर्वकथन म्हणजे ज्योतिषाने सांगितलेले भविष्य नव्हे. जे घडून येईल, अगर येणार नाही. उदा. गुन्हेगारी चित्रपटाने गुन्ह्याच्या कल्पना पुरवल्या असा नियम प्रस्थापित केला तर उद्या गुन्हेगारी चित्रपट प्रमाण वाढेल व इतर परिस्थिती तशीच राहिली तर गुन्ह्याचे प्रमाण निश्चितच वाढेल. असे सांगणे म्हणजे पूर्वकथन होय. सामाजिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे व अपेक्षित सामाजिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी, सामाजिक समस्या नियंत्रित करण्यासाठी पूर्वकथन उपयुक्त आहे.
आता पर्यंत शास्त्रासाठी आवश्यक असलेल्या कसोट्यांची नोंद करून ती प्रत्येक कसोटी समाजशास्त्राला लागू पडत असल्याने स्पष्ट होते. याव्यतिरिक्त काही अभ्यासकांनी समाजशास्त्राचे स्वरूप दर्शवणारे काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत.
राॅबर्ट ब्रिअरस्टेड ;त्वइमतज ठपमतेजमकद्धरू
राॅबर्ट ब्रिअरस्टेड यांनी समाजशास्त्राचे स्वरूप दर्शविणारी वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगितली आहेत.
1. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मात्र ते नैसर्गिक शास्त्र नाही.
2. समाजशास्त्र युद्ध किंवा सैद्धांतिक शास्त्र आहे. पण ते व्यावहारिक शास्त्र नाही.
3. समाजशास्त्र अमूर्त शास्त्र आहे.
4. समाजशास्त्र सामान्यीकरण करणारे शास्त्र आहे. ते विशेषीकरण करणारे शास्त्र नाही.
5. समाजशास्त्र अनुभवजन्य शास्त्र आहे.
6. ते सामान्यविज्ञान आहे. विशेष विज्ञान नाही.
हॅरी जाॅन्सन यांनी सांगितलेले स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:
1. समाजशास्त्र अनुभवजन्य शास्त्र आहे:
शास्त्रात ज्ञान प्राप्त करताना अनुभवावर भर देतो येतो. जे अनुभवातून सिद्ध होत नाही. त्याला शास्त्रात कोणतेही स्थान नसते. उदा. कल्पना, श्रद्धा, विश्वास, इ. गोष्टींना वैज्ञानिक चौकटीत वाव नसतो. समाजशास्त्र एक शास्त्र असल्यामुळे निरीक्षणातून मिळवलेल्या आणि तर्कशास्त्राच्या आधारावर तपासलेल्या ज्ञानाचा समावेश होतो. समाजशास्त्रात मानवी जीवनाविषयी अनुभवावर प्राप्त ज्ञानाच्या आधारे संकल्पना आणि सिद्धांताची मांडणी करता येते. म्हणून या शास्त्राला अनुभवजन्य शास्त्र असे म्हणतात.
2. हे सैद्धान्तिक शास्त्र आहे:
विज्ञानात अनुभवजन्य पद्धतीने तथ्यांचे संकलन केल्यानंतर त्या माहितीला निश्चित रूप देण्यात येते आणि सिद्धांत मांडले जातात. समाजशास्त्रात घटनांचे वैज्ञानिक रितीने अध्ययन करण्यात येऊन तथ्ये संकलित केली जातात. या तथ्यांच्या अमूर्तीकरणातून सिद्धांत प्रतिपादन केले जातात. आणि म्हणून समाजशास्त्राला सैद्धान्तिक शास्त्र म्हणतात. उदा. एमिल डुरखाईम यांनी तथ्यांचे संकलन करून आत्महत्येचा सिद्धांत मांडला आहे
.3. समाजशास्त्र संचयी शास्त्र आहे:
विज्ञानात ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सातत्याने चाललेली असते. एक प्रकारे ज्ञानाचा संचय केला जातो. प्राप्त केलेल्या ज्ञानाचे वैज्ञानिकरीतीने परीक्षण व पूर्नपरिक्षण करून ज्ञानाचे क्षेत्रात नवीन भर टाकली जाते. म्हणून शास्त्र संचयी असते. समाजशास्त्र देखील अभ्यास वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक घटनांबाबत ज्ञान प्राप्त करतात. त्या ज्ञानात नवीन अध्ययन पद्धती तंत्र, आणि त्यावर केलेली टिका लक्षात घेऊन नव्याने भर टाकण्यात येते. त्यातून ज्ञानाचा संचय होतो.
4. हे नैतिकदृष्ट्या तटस्थ शास्त्र आहे.
विज्ञानात तथ्यांचे संकलन करीत असताना. नैतिक तटस्थतेवर लक्ष केंद्रित केले जाते. अभ्यासक वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून तथ्य एकत्रित करतो. या तथ्याबाबत चांगले-वाईट, योग्य, अयोग्य, आवडते-नावडते अशा शब्दात अभिप्राय देत नाही. कारण असे अभिप्राय संशोधन करणाऱ्याचा पक्षपाती दृष्टीकोन व्यक्त करतो समाजशास्त्रात मूल्यात्मक अभिप्राय व्यक्त केले जात नाही. भिक्षावृत्ती, किंवा वेश्यावृत्ती चांगली की वाईट या वादात न पडता त्याचा तटस्थपणे अभ्यास केला जातो.
यावरून असे स्पष्ट होते की, समाजशास्त्राचे स्वरूप शास्त्रीय आहे.
समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्राशी संबंध
समाजशास्त्रात मानवी वर्तनाचे अध्ययन केले जाते. इतर सामाजिक शास्त्रे मानवी वर्तनाच्या अध्ययनास केंद्रीय मानतात. या शास्त्रात मानवशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र इतिहास, राज्यशास्त्र इ. समावेश होतो. ही शास्त्रे मानवी वर्तनाच्या एका विशिष्ट अंगाचे अध्ययन करतात. मानवी वर्तनाच्या अभ्यासासाठी संबंधित असलेल्या सर्व शास्त्रात पारस्परिक संबंध असणे अपरिहार्य आहे. हे संबंध पाळणे गरजेचे आहे. ते पुढीलप्रमाणे.
1. समाजशास्त्र व मानवशास्त्र
समाजशास्त्र व मानवशास्त्र ही दोन सामाजिक शास्त्रे आहेत. समाजशास्त्रात मानवी समाजाचे तर मानवशास्त्र मानवाच्या अभ्यासाशी निगडित आहे. मानवशास्त्रात प्रामुख्याने आदिवासी समाजाचा अभ्यास अपेक्षित आहे. याप्रकारे दोन्ही शास्त्रे मानवी जीवनाला अध्ययनाचे केंद्रबिंदू मानतात म्हणूनच अनेक अभ्यासकांनी सामाजिक मानव शास्त्राला समाजशास्त्राची एक शाखा या हेतूने संबोधले आहे. परंतु या शास्त्राचा अभ्यास आदिवासी व ग्रामीण समुदायापुरतेच मर्यादित आहे. या विषयीचा अभ्यास समाजशास्त्रात देखील केला जातो. परंतु या दोन्ही शास्त्रामध्ये काही अंतर दिसून येते. ते पुढीलप्रमाणे.
1) समाजशास्त्रात वर्तमानकालीन समाजाचे अध्ययन करता येते. तर सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी समाजाचा अभ्यास केला जातो.
2) समाजशास्त्राचा दृष्टीकोन विशेषात्मक आहे तर मानवशास्त्र वर्णनात्मक समजला जातो.
3) समाजशास्त्रात मुलाखत, प्रश्नावली, निरीक्षण, या अभ्यास पद्धतीचा उपयोग केला जातो. तर मानवशास्त्रात सहभागी निरीक्षण ही पद्धत अवलंबली जाते.
4) समाजशास्त्र विशुद्ध विज्ञान आहे. तर मानव शास्त्राला उपयोजित विज्ञान मानतात.
या दोन्ही शास्त्रामध्ये फरक जरी असले तरी व्यापक दृष्टीने पाहता हे दोन्ही शास्त्रे परस्परांशी संबंधित आहेत.
2. समाजशास्त्र व अर्थशास्त्र
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा व्यतिरिक्त त्याच्या अन्यही गरजा आहे. परंतु अमर्यादित गरजांची पूर्तता करणारी साधने अत्यंत मर्यादित आहेत.या दोन्हीमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थशास्त्र करते. हा प्रश्न सोडविण्यासाठी मानवाचे चालू असलेले प्रयत्न म्हणजे आर्थिक वर्तन होय. मानवांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी संपत्तीचे उत्पादन व वितरण कसे होते त्याला अर्थशास्त्र असे म्हणतात.
अर्थशास्त्र एका बाजूने संपत्तीचा अभ्यास आहे तर दुसऱ्या अधिक महत्त्वाच्या बाजूने मानवाचा अभ्यास आहे. उदा. गिरणी कामगारांचा संप ही केवळ आर्थिक बाजू नसून त्यात सामाजिक बाबी देखील गुंतल्या आहेत. बेकारी ही आर्थिक क्षेत्रातली असली. तरी तिचे परिणाम सामाजिक असल्याने सामाजिक समस्या म्हणून तिचे अध्ययन करावे लागते. या व्यतिरिक्त, संप, वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी, दारिद्र्य इ. समस्या सोडविण्यासाठी दोन्ही शास्त्रांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतात. औद्योगिक प्रगतीने आर्थिक विकास तर होतोच पण त्याचबरोबर सामाजिक परिवर्तनही घडून येते. म्हणूनच असे म्हणले जाते की, समाजशास्त्र व अर्थशास्त्र हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
3. समाजशास्त्र व राज्यशास्त्रः
समाजशास्त्राचे मूळ इतिहास व राज्यशास्त्रात सापडते राज्यशास्त्राचा अभ्यासविषय राज्य संस्था, ही मूलतः समाजव्यवस्थेचा एक घटक असून ती एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. मानवाचे राजकीय वर्तन हा त्याच्या सामाजिक वर्तनाचा एक भाग आहे. कल्याणकारी राज्याची कल्पना साकार करण्यासाठी राज्य शास्त्राला समाजशास्त्र विचारांचा व संशोधनाचा आधार घ्यावा लागतो. लोकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे सरकार मिळते. या लोकप्रिय विधानातून राजकारण हे समाजाचे प्रतिबिंब आहे हे स्पष्ट होते. याबरोबरच कायदा, प्रशासन, नियंत्रण, गुन्हे, आंतरराष्ट्रीय सहकार्य असे अनेक विषय दोन्ही शास्त्रात आढळतात.
समाजशास्त्राचे महत्त्व
समाजशास्त्राच्या महत्त्वाच्या संदर्भात दोन प्रमुख दृष्टीकोनांचा विचार करावा लागतो. 1) शुद्ध संशोधन मधील आणि 2) उपयोगितावादी.
संशोधनानुसार ज्ञानाचा विकास आपले लक्ष्य असावे याउलट शास्त्र व त्यांत प्राप्त केलेले ज्ञान हे मानवी जीवनासाठी आहे. असा उपयोगिता किंवा व्यवहार वाद्यांचा विचार आहे. परंतु, समाजशास्त्राचे महत्त्व लक्षात घेताना या दोन्ही विचारांचा समन्वय साधणे गरजेचे आहे.
1) मानवी समाजाचे अध्ययनः
समाजशास्त्र विषयात मानवी समाजाचे यथार्थ स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही समाजाला वस्तुनिष्ठपणे जाणून घेतल्याशिवाय त्या समाजाच्या विकासाचा व त्या समाजातील प्रश्नांच्या निराकरणाचा विचार करता येणार नाही. त्यामुळे समाजशास्त्रात मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे.
2) सामाजिक समस्यांचे अध्ययनः
मानवी समाज टिकून राहावा म्हणून त्यात उद्भवणाऱ्या समस्या सोडविणे महत्त्वाचे आहे. आधुनिक काळात या समस्यांची संख्या व तीव्रता वाढत असल्याचे दिसून येते. या समस्यांची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने व समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने समस्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या समस्या मानवी समाजाशी संबंधित असल्याने समाजशास्त्रात त्याचे अध्ययन केले जाते. म्हणून समाजशास्त्र हा विषय महत्त्वाचा आहे.
3) तणाव निवारणः
मानवी समाजात सजातीयता ऐक्य सहकार्य असावे असे वाटते परंतु तसे चित्र दिसत नाही. लोकांचे विचार, प्रथा, परंपरा, मूल्ये, ध्येये वेग-वेगळी असतात. यातूनच विजातीयतेचे दर्शन होते. व परस्परांविषयी मतभिन्नता संदेह निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होते. तणावामुळे संघर्ष उद्भवतो व याचा वाईट परिणाम समाजावर होतो व ऐक्य या भावनेला तडा जातो. खरे पाहिले तर तणाव व्यक्ती व विभिन्न गटात अगदी शुल्लक कारणावरून उद्भवतात. लोक बुद्धिवादापेक्षा भावनेच्या आहारी जातात व विपरीत घडते.
भारतासारख्या देशात धर्म, पंथ, जाती, भाषा, वर्ग, प्रदेश, पक्ष विषमता इ.मुळे समाजाचे विभाजन झाले आहे. या गटात बऱ्याचवेळा संघर्ष होतात 1983 साली पूर्वग्रह, गैरसमज, अज्ञान, मिथ्याधारणा इ. दंगली झाल्या. तणावांचे शास्त्रशुद्ध अध्ययन करण्याचे कार्य समाज शास्त्रज्ञांचे आहे. अभ्यासक झालेल्या तथ्यांच्या आधारावर ते तणाव निरसनासाठी सूचना मांडतात व समाजातील ऐक्य (एकता) टिकाऊ शकतात.
4) समाजकल्याणः
समाजातील सर्व व्यक्ती किंवा गटांमध्ये समान गतीने प्रगती होत नाही. काही गटांना जास्त संधी मिळते ते प्रगतीकडे वाटचाल करतात. याउलट काही गट दुर्लक्षित, उपेक्षित राहतात अशा गटांकडे लक्ष पुरविले नाही. तर त्या गटांची उपेक्षा वाढते व समाजाच्या प्रगतीला अडथळे येतात. भारत शासनाने ‘सर्वांचे सर्व कल्याण’ हे ध्येय निश्चित केले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी उपेक्षित गटांकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना तयार कराव्यात उपेक्षितांचे अध्ययन करून योजना बनविण्याचे कार्य समाजशास्त्रज्ञ करू शकतात.
भारतातील उपेक्षित गटांमध्ये बालक, महिला, वृद्ध, आदिवासी, अस्पृष्य, कामगार वर्ग इ. समावेश होतो. यांचे अध्ययन करून व समस्या लक्षात घेऊन कल्याण कार्यक्रमाची आखणी केली जाते व यात उपयोग समाजशास्त्राचा होतो.
5) सामाजिक नियोजनः
विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी एक निश्चित दिशेने सामाजिक सांस्कृतिक बदल घडवून आणणारा आराखडा म्हणजे नियोजन होय. कोणत्याही प्रकारचा विकास घडवून आणणे किंवा समस्या सोडविण्यासाठी सामाजिक नियोजन आवश्यक आहे. नियोजन करताना त्या समाजाच्या वास्तविक परिस्थितीची आणि समस्यांच्या स्वरूपाची पूर्ण जाणीव असावी लागते. हे कार्य समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे जमू शकते. कारण तो समाजशास्त्राचा अभ्यास विषय मानला जातो. म्हणजेच सामाजिक नियोजनाच्या हेतूसाठी समाजशास्त्राचे अध्ययन महत्त्वाचे आहे.
6) व्यावसायिक महत्त्वः
1. वैद्यकीय समाजशास्त्र, औद्योगिक, ग्रामीण समाजशास्त्राच्या अभ्यासकांना प्रकल्प अधिकारी म्हणून संधी उपलब्ध होते.
2. विकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, कारागृह अधीक्षक श्रमिक कल्याण अधिकारी, बाल-कल्याण अधिकारी इ. क्षेत्रात संधी उपलब्ध आहे.
3. षिक्षक, प्राध्यापक, कुटूंब नियोजन प्रकल्प, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, स्त्री कल्याणकारी संस्था, इ. क्षेत्रात देखील समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना संधी उपलब्ध आहे.
समाजशास्त्रात अनेक उपशाखा आहेत समाजशास्त्रात विविध समस्या घेऊन अभ्यास केला जातो. समाजशास्त्रात अनेक शास्त्रज्ञांनी विविध सिद्धान्त मांडला आहे यांमध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहे. तसेच त्यांनी ग्रामीण व शहरी भागाचा अभ्यास समाजशास्त्रात केला आहे. सामाजिक चळवळी व त्यांचा समस्या समाजशास्त्रात मांडल्या आहेत.
तुलनात्मक समाजशास्त्र
राजकीय समाजशास्त्र
== धार्मिक समाजशास्त्र
भारतीय ग्रामीण समाजशास्त्रात भारतातील ग्रामीण संरचनांचा, जातिव्यवस्थेचा, गावाच्या आर्थिक आणि राजकीय संरचनांचा अभ्यास केला जातो.
मराठी ग्रामीण समाजशास्त्राच्या सुरुवातीच्या अभ्यासासाठी वरदा प्रकाशनाने पुनःप्रकाशित केलेले त्र्यंबक नारायण अत्रे यांचे गावगाडा हे पुस्तक उपयुक्त आहे. शेती हा ग्रामीण जीवनाचा पाया आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी जीवनशैलीचा यामध्ये समावेश असतो.
== शैक्षणिक समाजशास्त्र ==समाजशास्त्रचे महत्त्व
== पर्यावरणाचे समाजशास्त्र == व्याख्या
कार्ल मेनहिंम ज्यांनी ज्ञानाचे समाजशास्त्र ह्या शाखेला जन्म दिला ही ज्ञानाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी शाखा आहे.[3] म्हणजेच व्यक्तींच्या सामाजिक अस्तित्वाच्या माध्यमांतून सामाजिक विश्व आणि ज्ञान यांमधील नाते ठरते. याचाच अर्थ असा की, विशिष्ट सामाजिक गटाच्या कल्पना त्या गटाच्या सामाजिक संरचनेतील स्थानाशी संबंधित असतात. कार्ल मार्क्सने सामाजिक वर्गाच्या त्याच्या विश्लेषणामध्ये त्याने कल्पनांचे नाते सामाजिक वर्गाशी जोडले आहे; याचाच अर्थ असाही होतो की, ज्ञानाच्या विचारविश्वाच्या समाजशास्त्राची मांडणी मेनहिंमने त्याच्या आधीच्या अनेक समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या कार्याचा आधार घेऊन केली आहे. मर्टनने(१९५७) केलेल्या व्याख्येनुसार, ज्ञानाचे समाजशास्त्र हे कल्पनांचा किंवा वैचारिक व्यवहारांचा पद्धतशीर अभ्यास करते.[4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.