रॅम
From Wikipedia, the free encyclopedia
रँडम ऍक्सेस मेमरी अर्थात रॅम हा संगणकाचा माहिती साठवण्याचा एक भाग आहे.[1] हा भाग संगणकामध्ये स्मृती सारखा काम करतो. रॅंडम एकसेस म्हणजे साठवलेली माहिती कोणत्याही क्रमाशिवाय संगणकाला वापरण्यासाठी उपलब्ध होते. रॅमला पुरवण्यात येणारी उर्जा खंडित केल्यास रॅमवर साठवलेली सर्व माहिती नष्ट होते.याविपरीत हार्ड-डिस्क्, कॉम्पॅक्ट् डिस्क् (CD), डि. व्हि. डि. (DVD) मधील माहिती ऊर्जा खंडित केल्यानंतर मिटवली जात नाही.