दशानन From Wikipedia, the free encyclopedia
रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण तर माता कैकसी ही उच्च, दानव कुळातील होती.
रावण हा भगवान शिवाचा भक्त होता. असे म्हंटले जाते की एकदा स्वप्नात शिवानी रावणाला दर्शन दिले आणि कैलासाला बोलावले, रावण कैलासाला जाऊन शिवाला म्हणाला की तुम्ही लंकेत या मी तुम्हाला सोन्याने मढवतो, त्यावर भगवान शिव म्हणाले की तू मला नेणार असशील तर कैलासा सोबत ने! रावणाने रौद्ररूप धारण करून कैलासा सहित शिवाला उचलले, परंतु शिवाने आपल्या पायाचा अंगठा जमिनीवर टेकवला त्याक्षणी रावणाची बोटे कैलासाखाली अडकून राहिली, अडकलेला हात बाहेर काढल्यानंतर त्याठिकाणी दहा गुहा तयार झाल्या सर्व गुहांमध्ये ५ किमीचे अंतर आहे . रावणाला खूप नावाने ओळखले जाते : रावण, रुद्राक्ष , मेलुहेश , लंकेश , प्रजापती , लँकेशवर , काल , अहिरावण ,मातंग , गिरधारी , गिरलिंग , मानस , कलिंग , मर्दन , कलांकेश्र्वर इत्यादी.
रावणाला कुबेर, विभीषण, कुंभकर्ण, अहिरावण, खर आणि दूषण असे सहा भाऊ व दोन बहिणी- शूर्पणखा आणि कुंभिनी होत्या. पैकी शूर्पणखा, कुंभकर्ण आणि विभीषण हीच फक्त रावणाची सख्खी भावंडे होती. कुंभिनी ही मथुरेच्या मधुदैत्याची पत्नी झाली. लवणासुर हा त्यांचा पुत्र. कालकेचा मुलगा दानवराज विद्युविव्हा हा शूर्पणखेचा पती होता. अहिरावण हा पातालपुरीचा राजा होता ज्याचा वध हनुमानाच्या हातून झाला.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
एक उपकथानक सांगते की रावणाने ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले. त्यावेळी त्याने आपले एक एक शिर कापून ब्रह्मदेवाला समर्पण केले. ९ शिरे कापून समर्पण केल्यानंतर ब्रह्मदेव रावणाच्या तपश्चर्या व आंतरिक इच्छेवर प्रसन्न झाला. येथे जेव्हा रावण आपले शिर समर्पित करीत होता, त्यावेळी त्याला त्या मुखात अवगत असलेली ज्ञान संपदा तो ब्रह्मदेवाच्या चरणी ठेवत होता. हा एक महान त्याग होता.
ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व दिले होते. त्याला एक अमृताची कुपी दिली गेली. ती त्याच्या नाभीच्या खाली ठेवली गेली.
२. ब्रह्मदेव रावणाला म्हणाले ” फक्त ह्या कुपीचे रक्षण कर. तुझ्याजवळ मृत्यू येणार नाही. ही जर फुटली तरच मृत्यू ओढवेल.” त्याचा आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास होता. कुणीही त्याला हानी पोहचवणार नाही ह्याची त्याला खात्री होती. ह्या वरदानाला त्याने गुपित ठेवले. कारण ते त्याच्या मृत्यूशी संबंधित होते. फक्त एक चूक रावणाकडून झाली. तो आपला धाकटा भाऊ बिभीषण ह्याच्यावर फार प्रेम करीत असे. तसाच त्याचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्याच विश्वासाने ब्रह्मदेवाचे वरदान त्यास सांगितले. त्याच्या नाभीजवळच्या अमृत कुपीविषयी त्यास सांगितले. कदाचित् ही देखील ब्रह्मदेवाचीही ती योजना असावी कां ? कारण कोणताही मानव अमरत्व पावू शकत नसतो. कालांतराने त्याचाच तो प्रिय बंधू त्याच्या विरोधात गेला. रामाला तो जाऊन मिळाला. रावणाच्या मृत्यूचे गुपित त्यानेच रामास सांगितले. रावणाचा त्यामुळेच अंत होऊ शकला.
एका कथाभागांत रावणाने शिवाला आपल्या तपश्चर्येने प्रसन्न केले. वरदान म्हणून शिवाचे आत्मलिंग मागितले. ही सारी शिवाची आंतरिक शक्ती समजली जाते. हीच रावणाने मागितली. शिवाने ती देऊ केली. रावण शिवाच्या त्या शक्तीला आपल्या जवळ बाळगण्यासाठी लंकेस घेऊन जाणार होता. शिवाने आत्मलिंग देतानाच फक्त एक अट घातली होती. "हे लिंग तू स्वतः बाळग. त्याला केव्हाही जमिनीवर ठेवू नकोस. ज्या क्षणी ते जमिनीवर टेकेल त्याची सारी शक्ती परत मजकडे येईल.” आत्मलिंग हे जगाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून रावणाच्या ताब्यांत लंकेत असणे हे केव्हाही उचित नव्हते. मग काही घटना घडल्या. श्री विष्णूनी सूर्यप्रकाश झाकला. अंधार झाला. संध्याकाळ ही रावणाची संध्या करण्याची वेळ. गणपती याने ब्राह्मण बालकाचे रूप घेतले. रावणाने संध्या होईपर्यंत शिवात्मलिंग त्याच्या हाती दिले. मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेवू नकोस हे सांगितले. त्याच वेळी गणपती म्हणाला "मी तीन वेळी तुला बोलावीन. जर तू आला नाहीस तर मी ते खाली ठेवेन.” अर्थात असेच घडले. रावणाच्या संध्येमधल्या गर्क असण्याचा फायदा उठवत ते लिंग गणपतीने जमिनीवर ठेवले. ती जागा आज कर्नाटकांत मुरुडेश्वर ह्या नांवाने ओळखली जाते.
३) रावणाचे व्यक्तिमत्त्व : तो एक ब्राह्मण राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. रावणाचे एक आजोबा (आईचे वडील) राजा सुमाली यानी त्याला दैत्य संकल्पनेत शिक्षण दिले होते.
४) रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्यादेखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती.
रावणाला दशानन अथवा दशग्रीव्हा (दशमुखी) हे नांव पडले होते. याच्या अर्थ ज्याला दहा तोंडे मिळाली आहेत असा. दहा तोंडे ह्याचा सांकेतिक अर्थ त्याला महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. प्रत्येक विषयामधील एकेका विद्वानाची (Total Ten Scholars) बौद्धिक योग्यता केवळ एकट्या रावणामध्ये एकवटली होती. हीच १० पंडितांची विद्वत्ता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे, त्याला १० तोंडांचा असे म्हणले जाते. अविचारी लोक १० तोंडाची संकल्पना त्याच्या असुर असण्यावर लावतात. टीका करतात. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण (Brahmani) संबोधित असे. म्हणूनच जेव्हा रावण मृत्युशय्येवर पडला, तेव्हा रामाने त्याला अभिवादन केले.
रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली ”तू रावणाजवळ जा आणि रावणाकडून जीवनाचे गुपित आणि त्याची महानता समजून घे.” रामाने जो अश्वमेध यज्ञ केला होता त्याचे एक कारण ब्रह्महत्या दोषाचे पापक्षालन करणे हे सुद्धा होते. (ती त्या काळानुरूप संकल्पना होती. गुरू वसिष्ठ यांनीच रामास तसे सुचविले होते.)
लंकाधिपती रावण ही रामायणातील एक उत्तुंग, भव्य, दिव्य व्यक्तिमत्त्वप्राप्त रूपरेखा होता. रावणाचे पिता ऋषी विश्रवा हे वेद, उपनिषदे ह्या शास्त्रांत पारंगत होते. त्यानीच रावणाला हे शास्त्रज्ञान दिले. त्याचप्रमाणे शस्त्रविद्येतही तरबेज केले होते.
कुबेर याला देवांचा धन खजाना बाळगणारा समजले गेले. ( A treasure of God ). हा रावणाचा थोरला भाऊ म्हणजे विश्रवा ऋषींचा पहिला मुलगा होता. कुबेर हा लंकाधिपती होता. परंतु रावणाने लंकेचे राज्य मागितले. ऋषी विश्रवा याना रावणाचे शक्तिसामर्थ व महान बुद्धिमत्ता ह्यावर विश्वास होता. यांनी कुबेराची समजूत घातली व राज्य रावणास देऊ केले. एक मात्र सत्य होते की रावणाने लंकेचे राज्य अत्यंत यशस्वीपणे चालवले. सर्व गरीब जनता, सामान्यजण, धार्मिक ऋषीमुनी त्याच्यावर खूश होते. तो सर्वांवर प्रेम करी. त्या काळी प्रत्येकाकडे सोन्याची भांडी होती.
त्रेतायुगाच्या मानवी वैचारिक नीतिअनीतीच्या संकल्पनेतील फक्त एक (परस्त्रीहरणाचे) वाईट कृत्य रावणाच्या हातून घडले. नीतिमत्ता व निरोगी समाज धारणा ह्याची लिखित वा अलिखित मूल्ये ही सुसंस्कृतपणाची लक्षणे. ही सनातनी व म्हणून अतिप्राचीन समजली गेली.
रावण आयुर्वेद ( Ayurveda Science ) जाणत होता. त्याला राज्यशास्त्राचे ( Political Science) ज्ञान होते. हिंदू फल ज्योतिषशास्त्र ( Astrology ) ह्या विषयांत तो तज्ज्ञ होता.
रावणसंहिता हे हिंदू ज्योतिषावरचे तगडे पुस्तक आहे..
रावणाला संगीताची आवड होती. तो चांगला वीणावादक होता.
फार पुरातन संस्कृतीमध्ये अवयवांची बहुसंख्या हे दिव्यत्वाचे व त्याप्रकारच्या शक्तीचे दर्शक मानले जात असे. जसे चतुर्भुजा, षट्भुजा, अष्टभुजा, दशभुजा वगीरे देवी. दोन मुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी हे वर्णनपण येते. हे सारे शक्ती, बुद्धी ह्यांचे द्योतक समजले जात असे. रावणाचे दशानन हे वर्णनदेखील ह्याच संदर्भात प्रसिद्ध पावले आहे. ”दहा विद्वतापूर्ण बुद्धिमत्तांचा ठेवा” ही त्यामागची संकल्पना होती. रावणाच्या विरोधकांनी त्याचा विपर्यास करून त्याला दहा तोंडाचा असुर बनवले.
काही इतिहास संशोधक रावणकथा ही पौराणिक न समजता घडलेला इतिहास मानतात. त्यांच्यामते हा काळ इ.स. पूर्वी २५५४ ते २५१७ ह्या काळातील असावा.
तिबेटमध्ये हिमालयाच्या पर्वतमय उंच पठारी प्रदेशात कैलास पर्वतानजीक मानससरोवर हा पाण्याचा साठा असलेला मोठा तलाव आहे. ते पाणी अतिशय चवदार व गोड आहे. त्याच्याच शेजारी तसाच एक मोठा पाण्याचा साठा असलेला तलाव आहे. मात्र हे पाणी खारे आहे. जगामध्ये एक वैचित्र्यपूर्ण आणि विशिष्ट असा हा परिसर. ह्याच परिसरांत रावणाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात. ( खाऱ्य़ा पाण्याच्या तलावाला काहींनी राक्षसताल हे नाव दिले आहे.)
दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या वृत्तींचा वाईट वृत्तींवर विजय ( Symbolization of Triumph over Evil ) हे व्यक्त करण्यासाठी रावणप्रतिमा करून तिचे दहन करतात. ही एक सामाजिक प्रथा झालेली आहे. भारतात “होळी पेटवून” तिच्यात वाईट विचारांचे प्रतीकात्मक दहन करतात. प्रत्येकजण ह्या रूढीमध्ये सहकार्य करतो. त्यांत उत्साह, आनंद, आणि वाईट गोष्टी सोडून देण्याची मानसिकता व्यक्त केली जाते. वाईट वृत्तीचे दहन त्या होळीला देवी समजून केले जाते. त्यांत कुणा व्यक्तीला टार्गेट केलेले नसते.
थायलंडमध्ये रावणाचे शिल्प आहे. शिवभक्त रावणाच्या शिवलिंगासह रावणाच्या कलाकृती तेथे आहेत. आहेत. भारतात काकिंद्रा (आंध्रप्रदेश) येथे कोळी समाज रावणाची पूजा करतो. हजारो कान्यकुब्ज ब्राह्मण समाज त्याला देव मानतात. ही वस्ती मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील रावणग्राम क्षेत्रात आहे. त्याला दररोज जेवण्याचा भोग दिला जातो. राजा शिवकरण याने रावणाचे मंदिर उत्तर प्रदेशांतील कानपूर येथे बांधले होते. हे फक्त वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी उघडले जाते. त्यादिवशी त्या रावणमूर्तीची पूजा होते. गुजरात आणि राजस्थान मधील मुद्गल गोत्राचे दवे ब्राह्मण स्वतःला रावणाच्या वंशाचे समजतात. त्याच बरोबर रावणाच्या गोत्राला धरून सारस्वत, गोदा आणि इतर विविध गोत्रात वादविवाद उत्पन्न होत आहेत.[1][2]रोज नियमित पणे रावणाची पूजा पाठ केली जाते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.