युरोपियन संघ
From Wikipedia, the free encyclopedia
युरोपियन युनियन (अर्थ:युरोपियन संघ) (The European Union-EU) अथवा युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २७ देशांचा संघ आहे. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे. युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले आहे. संघाची एकूण लोकसंख्या ४९ कोटी ३० लाख आणि वार्षिक उत्पन्न (GDP) €१०५ ($१३७) निखर्व आहे. युरोपियन संघात खालील देश आहेत.
आयरिश: An tAontas Eorpach
हंगेरियन: Európai Unió | |
युरोपाचा ध्वज | |
जगाच्या नकाशावर युरोपियन संघ | |
लघुरूप | EU |
---|---|
ध्येय | United in diversity (विविधतेमध्ये एकता) |
स्थापना | २५ मार्च १९५७ |
सदस्यत्व | |
अधिकृत भाषा | २३ |
युनायटेड किंग्डममध्ये २३ जून २०१६ रोजी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ब्रिटिश नागरिकांनी युरोपियन संघ सोडण्याच्या बाजूने कौल दिला.[1][2] त्यामुळे २०१९ साली युनायटेड किंग्डम अधिकृतपणे युरोपियन संघातून बाहेर पडेल.[1]