ग्रीस
दक्षिण युरोपातील एक देश / From Wikipedia, the free encyclopedia
ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. बाह्यजगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीसमध्ये त्या देशाला हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. (Ελληνική Δημοκρατία, Ellīnikī́ Dīmokratía, [e̞liniˈkʲi ðimo̞kɾaˈtia]),[1]. तसेच ग्रीसला यूनान व यवन (संस्कृत मध्ये) या नावाने पण ओळखल्या जाते. प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही[2], ऑलिंपिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला[3] व तत्त्वज्ञान[4] यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच तेथील गणितज्ञ, इतिहासकार, महान योद्धे,, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे.
हेलास Ελληνική Δημοκρατία हेलेनिक प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "एलेफ्थेरिआ इ थानातोस" (अर्थ: स्वातंत्र्य किंवा मरण) | |||||
राष्ट्रगीत: इम्नोस इस तिन एलेफ्थेरिआन (अर्थ: स्वातंत्र्याचे गीत) | |||||
हेलासचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
अथेन्स | ||||
अधिकृत भाषा | ग्रीक | ||||
- राष्ट्रप्रमुख | कारोलोस पापुलियास | ||||
- पंतप्रधान | अलेक्सिस त्सिप्रास | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (ऑटोमन साम्राज्यापासून) मार्च २५, १८२१(घोषित) १८२९ (मान्यता) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १,३१,९५७ किमी२ (९७वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.८६६९ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | १,०८,१६,२८६ (७७वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ८२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २४५.८८ अब्ज अमेरिकन डॉलर (३७वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २२,८०० अमेरिकन डॉलर (३०वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो (EUR) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी+०२:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | GR | ||||
आंतरजाल प्रत्यय | .gr | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +३० | ||||
ग्रीस हा विकसित देश असून १९८१ पासून युरोपीय महासंघांचा प्रमुख सभासद आहे. याचे चलन युरो असून, पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मध्यम स्वरूपाची आहे.[5] ग्रीसची एकूण लोकसंख्या १ कोटी असून अथेन्स ही त्याची राजधानी आहे.स्पार्टा, सालोनिकी, पेत्रास ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.