माख क्रमांक
From Wikipedia, the free encyclopedia
द्रायुगतिशास्त्रामध्ये एखाद्या बिंदूला प्रवाहाच्या वेगाचे स्थानिक माध्यमातील आवाजाच्या वेगाशी गुणोत्तर म्हणजे माख क्रमांक (M) होय. माख क्रमांक ही मितिहीन राशी आहे.
जिथे:
- M = माख क्रमांक, (प्रवाह वेग/ध्वनिवेग)[1]
- u = प्रवाहाची स्थानिक गति, आणि
- c = माध्यमातील आवाजाचा वेग.
व्याख्येनुसार, माख १ म्हणजे आवाजाचा वेग. माख ०.६५ म्हणजे आवाजाच्या वेगाच्या ६५% वेग (सबसॉनिक), आणि माख १.३५ म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा ३५% जास्त वेग (सुपरसॉनिक).