भारत सासणे
मराठी कथाकार / From Wikipedia, the free encyclopedia
भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर येथे २०२२ मध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.[1]
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |