![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/46/Barabati_stadium.jpg/640px-Barabati_stadium.jpg&w=640&q=50)
बाराबती स्टेडियम
From Wikipedia, the free encyclopedia
बाराबती मैदान हे कटक, ओरिसा येथील एक खेळाचे मैदान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे नियमित ठिकाण आहे आणि ओडिशा क्रिकेट संघाचे हे होम ग्राऊंड आहे. सदर मैदान ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून मैदानाच्या सर्व कारभाराची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्याशिवाय हे मैदान फुटबॉलसाठीही वापरले जाते. मैदानावर संतोष चषक ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आणि ओडिशा पहिली विभागीय लीग फुटबॉल स्पर्धा खेळवली जाते. [1] भारतामधील सर्वात जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या बाराबती स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाण्याआधी एमसीसी, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियायी संघांचे सराव सामने झाले आहेत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य मैदान माहिती, स्थान ...
![]() | |
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | कटक, ओडिशा |
स्थापना | १९५८ |
आसनक्षमता | ४५,००० |
मालक | ओडिशा क्रिकेट असोसिएशन |
प्रचालक | ओडिशा क्रिकेट असोसिएशन |
यजमान |
ओडिशा क्रिकेट संघ (१९५८-सद्य) ओडिशा फुटबॉल संघ (१९५८-सद्य) डेक्कन चार्जर्स (२०१०-२०१२) किंग्स XI पंजाब (२०१४) कोलकाता नाईट रायडर्स (२०१४) |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
प्रथम क.सा. |
४-७ जानेवारी १९८७: भारत वि. श्रीलंका |
अंतिम क.सा. |
८-१२ नोव्हेंबर १९९५: भारत वि. न्यूझीलंड |
प्रथम ए.सा. |
२७ जानेवारी १९८२: भारत वि. इंग्लंड |
अंतिम ए.सा. |
१९ जानेवारी २०१७: भारत वि. इंग्लंड |
एकमेव २०-२० |
५ ऑक्टोबर २०१५: भारत वि. दक्षिण आफ्रिका |
शेवटचा बदल २० जानेवारी २०१७ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
बंद करा
क्रिकेट आणि फुटबॉलच्या मैदानावर दिवस-रात्र सामन्यांसाठी प्रकाशझोतांची व्यवस्था आहे.