![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/94/Cricket_shots.svg/langmr-640px-Cricket_shots.svg.png&w=640&q=50)
फलंदाजी
From Wikipedia, the free encyclopedia
क्रिकेटमध्ये, फलंदाजी करणे म्हणजे बॅटने चेंडू टोलविण्याची क्रिया वा कौशल्य, तसेच स्वतःला बाद होण्यापासून वाचवणे होय. फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला (तो फलंदाजी मध्ये कुशल नसला तरीही) बल्लेबाज किंवा फलंदाज म्हणून ओळखले जाते. बॅट्समनला विशेषकरून वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या क्रिकेट पिचवर खेळताना वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागते. तसेच त्याची शारीरिक क्षमता उत्कृष्ट असावी लागते, त्याचबरोबर वरच्या स्तरावरील फलंदाजामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया करण्याची क्षमता तसेच निर्णय क्षमता आणि चांगली रणनीती करण्याचे कौशल्य असते. [1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/94/Cricket_shots.svg/640px-Cricket_shots.svg.png)