![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/96/Graph_of_example_function.svg/langmr-640px-Graph_of_example_function.svg.png&w=640&q=50)
फल (गणित)
From Wikipedia, the free encyclopedia
गणितामध्ये फल[1][2] (मराठी नामभेद: फलन ; इंग्लिश: Function, फंक्शन) म्हणजे दोन परिमाणांमधील परस्परसंबंध दर्शवणारे समीकरण होय. यात एक परिमाण, ज्यास चल असे म्हणतात, दुसऱ्या परिमाणाचे, ज्यास परचल असे म्हणतात, फल असते. गणिती सूत्रांमध्ये मांडताना, x हे चल परिमाण निविष्टी असलेल्या f या फलाची निष्पत्ती f(x) या चिन्हाद्वारे लिहिली जाते. फलाची ही निष्पत्ती y हे परचल परिमाण मानल्यास, चल व परचल परिमाणांतील फलाच्या स्वरूपातला परस्परसंबंध खालील सूत्राद्वारे मांडला जातो :
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/96/Graph_of_example_function.svg/320px-Graph_of_example_function.svg.png)