पु.ल. देशपांडे
मराठी विनोदी लेखक, अभिनेते, नाटककार / From Wikipedia, the free encyclopedia
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.
पु.ल. देशपांडे | |
---|---|
![]() बडोदे, गुजरात | |
जन्म नाव | पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे |
टोपणनाव | पु.ल., भाई |
जन्म |
नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ मुंबई |
मृत्यू |
१२ जून, २००० (वय ८०) पुणे |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र |
नाटककार, साहित्यकार, संगीतकार विनोद, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत दिग्दर्शक |
वडील | लक्ष्मण त्रिंबक देशपांडे |
आई | लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे |
पत्नी | सुनीता देशपांडे |
अपत्ये | मानसपुत्र दिनेश ठाकूर |
पुरस्कार |
पद्मश्री सन्मान महाराष्ट्र भूषण साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मभूषण |
स्वाक्षरी |
![]() |
पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.[1][2]
त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. [3] दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. [4][5] भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले.[6] अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री (१९६६) आणि पद्मभूषण(१९९०) देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. [7]