सुनीता पुरुषोत्तम देशपांडे
मराठी लेखिका आणि चित्रपट अभिनेत्री / From Wikipedia, the free encyclopedia
सुनीता देशपांडे (जुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६; रत्नागिरी, महाराष्ट्र - नोव्हेंबर ७, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र), पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.
जलद तथ्य सुनीता देशपांडे, जन्म नाव ...
सुनीता देशपांडे | |
---|---|
जन्म नाव | सुनीता पुरुषोत्तम देशपांडे |
जन्म |
जुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६ रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
नोव्हेंबर ७, इ.स. २००९ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व |
![]() |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
प्रसिद्ध साहित्यकृती | आहे मनोहर तरी |
वडील | सदानंद महादेव ठाकूर |
आई | सरला सदानंद ठाकूर |
पती | पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे |
अपत्ये | मानसपुत्र दिनेश ठाकूर |
बंद करा
पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून १२, इ.स. १९४६ रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.