पद्मविभूषण पुरस्कार
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान / From Wikipedia, the free encyclopedia
पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो.
जलद तथ्य पुरस्कार माहिती ...
पद्मविभूषण | ||
पुरस्कार माहिती | ||
---|---|---|
प्रकार | नागरिक | |
वर्ग | सामान्य | |
स्थापित | १९५४ | |
प्रथम पुरस्कार वर्ष | १९५४ | |
अंतिम पुरस्कार वर्ष | २०२२ | |
एकूण सन्मानित | ३२५ | |
सन्मानकर्ते | भारत सरकार | |
पूर्व नावे | पहिला वर्ग | |
सुलट | ||
उलट | ||
रिबन | ||
प्रथम पुरस्कारविजेते | सत्येन्द्र नाथ बसु व इतर. | |
अंतिम पुरस्कारविजेते | डॉ.अनिल काकोडकर व इतर. | |
पुरस्कार क्रम | ||
भारतरत्न ← पद्मविभूषण → पद्मभूषण |
बंद करा
जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.