अमेरिकेतील शहर From Wikipedia, the free encyclopedia
न्यू यॉर्क हे लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील सगळ्यात मोठे शहर व जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांच्या यादीत समाविष्ट आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय असलेले हे शहर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक आहे. हे शहर अमेरिकेची मुंबई शहर म्हणून ओळखले जाते.
न्यू यॉर्क शहर New York City |
|||
अमेरिकामधील शहर | |||
घडाळ्याच्या काट्याप्रमाणे, वरून: मिडटाउन मॅनहॅटन, टाइम्स स्क्वेअर, क्वीन्समधील युनिस्फीयर, ब्रूकलिन ब्रिज, लोअर मॅनहॅटन व वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, सेंट्रल पार्क, संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय, आणि स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा |
|||
|
|||
गुणक: 40°43′N 74°00′W |
|||
देश | अमेरिका | ||
राज्य | न्यू यॉर्क | ||
स्थापना वर्ष | इ.स. १६२४ | ||
महापौर | मायकेल ब्लूमबर्ग | ||
क्षेत्रफळ | १,२१४.४ चौ. किमी (४६८.९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३३ फूट (१० मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ८२,७४,५२७ | ||
- घनता | १०,४८२ /चौ. किमी (२७,१५० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | ||
http://www.nyc.gov |
न्यू यॉर्क शहर अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू यॉर्क राज्यातील अटलांटिक किनाऱ्यावर असलेल्या मोठ्या नैसर्गिक बंदरावर वसलेले आहे. न्यू यॉर्क शहरामध्ये द ब्रॉंक्स, ब्रूकलिन, मॅनहॅटन, क्वीन्स आणि स्टेटन आयलंड ह्या पाच बोरोंचा (शहराचे प्रशासकीय उपविभाग) समावेश होतो - . इ.स.२००७च्या अंदाजानुसार न्यू यॉर्कमध्ये ८३ लाखांहून अधिक व्यक्ती राहतात.[१] याचे क्षेत्रफळ २०५ किमी२ आहे.[२][३] न्यू यॉर्क महानगराच्या ६,७२० किमी२ प्रदेशात १ कोटी ८८ लाख व्यक्ती राहतात.[४] बृहद् न्यू यॉर्क भागात २ कोटी ९६ लाख २० हजार व्यक्ती राहत असल्याचा अंदाज आहे, population 8,336,697 (2012).
न्यू यॉर्क शहराची मूळ स्थापना सन १६२४ मध्ये डच लोकांनी एक व्यापारी शहर म्हणून केली. स्थापनेवेळी डच लोकांनी त्याचे नाव 'न्यू ॲमस्टरडॅम' आणि न्यू ऑरेंज असे ठेवले होते. १६६४ साली शहर इंग्लिश वसाहतकारांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे नामकरण न्यू यॉर्क करण्यात आले. सन १७८५ पासून ते सन १७९० पर्यंत अमेरिकेची राजधानी न्यू यॉर्क ही होती.
न्यू यॉर्क अमेरिकेच्या व जगाच्या आर्थिक जगताचे प्रमुख केंद्र आहे. न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज व नॅसडॅक हे अमेरिकेतील हे प्रमुख शेअर बाजार न्यू यॉर्कमध्ये आहेत. अनेक महत्त्वाच्या सांस्कृतिक चळवळींचा उगम न्यू यॉर्कमध्ये झाला. त्याचप्रमाणे हॉलिवूडनंतर अमेरिकीतील मोठा चित्रपट व दूरदर्शन यांचा उद्योग न्यू यॉर्क येथून चालतो. ब्रॉडवे ही नाट्यसंस्था येथे आहे. न्यू यॉर्कची नागरी सार्वजनिक वाहतूक संस्था ही जगातील सर्वात मोठ्या व सर्वोत्तम नागरी वाहतूक संस्थांमध्ये गणली जाते.
न्यू यॉर्क शहरातील अनेक ठिकाणे ही जगप्रसिद्ध पर्यटण आकर्षणे आहेत , उदा. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, टाइम्स स्क्वेअर, एम्पायर स्टेट बिल्डींग. न्यू यॉर्क शहर त्यातील अनेक अतिशय उंच इमारतींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात एंपायर स्ट्रीट बिल्डिंग, (२००१ च्या अतिरेकी हल्ल्यात पडलेले) वर्ल्ड ट्रेड सेंटर, क्रायस्लर बिल्डिंग ह्यांचा समावेश आहे.
अमेरिकेतील इतर बहुतांशी मोठ्या शहरांच्या तुलनेत न्यू यॉर्क शहरात सरकारी परिवहनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. रोज सुमारे ५५% लोकसंख्या भुयारी रेल्वे व बस मार्गांने प्रवास करते. न्यू यॉर्क सबवे ही जगातील सर्वात मोठी शहरी रेल्वे संस्था आहे.
न्यू यॉर्क शहर तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांनी जगाशी जोडले गेले आहे. जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ व लाग्वार्डिया विमानतळ हे न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात स्थित आहेत तर न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ शेजारील न्यू जर्सी राज्यात आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.