हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे. From Wikipedia, the free encyclopedia
न्यू झीलंड हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे. प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या १,५०० किमी पूर्वेस उत्तर बेट व दक्षिण बेट ह्या दोन प्रमुख बेटांवर वसलेला न्यू झीलंड त्याच्या अति दुर्गम स्थानामुळे जगातील सर्वात उशिरा शोध लागलेल्या ठिकाणांपैकी एक होता.
न्यू झीलंड New Zealand Aotearoa | |||||
| |||||
राष्ट्रगीत: देवा न्यू झीलंडचे रक्षण कर | |||||
न्यू झीलंडचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | वेलिंग्टन | ||||
सर्वात मोठे शहर | ऑकलंड | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश, माओरी | ||||
सरकार | संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय प्रजासत्ताक | ||||
- राणी | एलिझाबेथ दुसरी | ||||
- पंतप्रधान | जेसींडा अर्डेन | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- १८५२ संविधान ठराव | १७ जानेवारी १८५३ | ||||
- संघराज्य | २६ सप्टेंबर १९०७ | ||||
- वेस्टमिन्स्टरचा कायदा | ११ डिसेंबर १९३१ | ||||
- १९८६ संविधान ठराव | १३ डिसेंबर १९८६ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २,६८,०२१ किमी२ (७५वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.६ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ४४,३०,४०० (१२२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १६.५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १२२.१९३ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २७,६६८ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.९०८ (अति उच्च) (५ वा) (२०१२) | ||||
राष्ट्रीय चलन | न्यू झीलंड डॉलर | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | न्यू झीलंड प्रमाणवेळ (यूटीसी + १३:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | NZ | ||||
आंतरजाल प्रत्यय | .nz | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ६४ | ||||
माओरी जमातीचे लोक येथे इ.स. १२५० - १३०० दरम्यान दाखल झाले व त्यांनी येथील माओरी संस्कृतीची स्थापना केली. इ.स. १६४२ साली आबेल टास्मान हा डच शोधक व खलाशी येथे पोचला. त्यानंतर १७६९ सालच्या जेम्स कूकच्या येथील सफरीनंतर येथे युरोपीय व्यापारी मोठ्या प्रमाणावर भेट देऊ लागले. इ.स. १८४० मध्ये ग्रेट ब्रिटनने माओरी लोकांसोबत करार करून न्यू झीलंडला ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलिन केले. इ.स. १९०७ मध्ये राजा सातव्या एडवर्डने न्यू झीलंडला साम्राज्यामध्ये एका स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला व १९४७ साली न्यू झीलँडला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले. सध्या ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी ही न्यू झीलंडची संविधानिक राष्ट्रप्रमुख असून जॉन की हे पंतप्रधान आहेत. वेलिंग्टन ही न्युझीलंडची राजधानी तर आॅकलॅंड हे सर्वात मोठे शहर आहे.
न्यू झीलंड हा जगातील एक प्रगत व समृद्ध देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात पाचव्या स्थानावर आहे. न्युझीलंड मध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.
क्रिकेट, रग्बी, फुटबॉल व नेटबॉल हे न्यू झीलंडमधील लोकप्रिय खेळ असून रग्बी युनियन, रग्बी लीग व क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघांना यश लाभले आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.