भारतातील महिलांसाठी सर्वोच्च नागरी सन्मान From Wikipedia, the free encyclopedia
नारी शक्ती पुरस्कार हा एक भारत सरकार तर्फे दिला जाणारा, महिलांसाठींचा सर्वोच्च पुरस्कार आहे. असामान्य कर्तृत्त्व दाखवणाऱ्या व्यक्तिगत महिलेस किंवा संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सहा विविध वर्गवारीत दिला जातो.[1]
नारी शक्ती पुरस्कार | |
---|---|
राष्ट्रपती रामनाथ कोविंद इ.स. २०१९ च्या पुरस्कार प्राप्त महिलांसोबत | |
देश | भारत |
प्रदानकर्ता | महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार |
Formerly called | स्त्री शक्ती पुरस्कार |
Reward(s) | १ - २ लाख |
प्रथम पुरस्कार | १९९९ |
शेवटचा पुरस्कार | - |
संकेतस्थळ | नारी शक्ती पुरस्कार |
कठिन परिस्थितित एखादी महिला आपली हिम्मत आणि अंतस्थ शक्ती नुसार जे अतुल्य कार्य करते, त्याचा हा सन्मान असून याद्वारे महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे हा उद्देश असून अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते[2][3] यात पुरस्कार विजेत्या महिलेस किंवा संस्थेस एक लाख रुपये आणि एक प्रमाण पत्र दिल्या जाते. या पुरस्काराची सुरुवात 'स्त्री शक्ती पुरस्कार' नावाने इ.स.१९९९ मध्ये झाली.[1]
या पुरस्काराचे नाव भारतीय इतिहासातील प्रसिद्ध स्त्रियांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[4][5]
१८व्या शतकातील माळव प्रांतातील एक राणी
प्रसिद्ध तामिळ महिला 'कण्णगी'च्या नावावर आधारित.
१७ शतकातील मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्या नावावर आधारित.
२०व्या शतकातील एक नागा आध्यात्मिक तथा राजनीतिक महिला, राणी गाएदिनलिउ ज़ेलियांगच्या नावावर आधारित.
झाशीची राणी तथा एक स्वातंत्र्य सेनानी राणी लक्ष्मीबाईच्या नावावर आधारित.
१३व्या शतकातील दक्षिणात्य राणी रुद्रम्मा देवीच्या नावावर आधारित।
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.