![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/36/Christ.svg/langmr-640px-Christ.svg.png&w=640&q=50)
नाताळ
येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा होणारा सण / From Wikipedia, the free encyclopedia
नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.[3] काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.[4][5] ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.[6] जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.[7] त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.
नाताळ | |
---|---|
अधिकृत नाव | नाताळ (ख्रिसमस) |
इतर नावे | ख्रिसमस डे, बडा दिन |
साजरा करणारे | ख्रिश्चन, अन्य अख्रिस्ती [1][2] |
प्रकार | ख्रिस्ती |
दिनांक | २५ डिसेंबर |
वारंवारता | वार्षिक |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d1/Nativity_tree.jpg/640px-Nativity_tree.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/85/Arbol_Navidad_03.gif/220px-Arbol_Navidad_03.gif)
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.[8] यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.