मराठी विकिपीडिया वर आलेल्या सर्व नवीन सदस्यांचे आम्ही मराठी विकिपीडिया परिवारातर्फे सहर्ष स्वागत आहे.
आपण आपल्या नावाची "नवीन नोंदणी" (Sign In) केली असेलच. नसेल तर अवश्य करावी. आपल्याला लेख संपादन करण्यासाठी त्याची मदत होईल. त्यासाठी पानाच्या वरील उजव्या कोपऱ्यात "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" येथे क्लिक करून नवीन नोंदणी करावी. जर शक्य असेल तर आपला विपत्र पत्ता (Email Address) नोंदणी करताना दिलात तर आपला पत्ता कोणालाही कळू न देता इतर सदस्यांना आपल्याशी Email वर संपर्क साधता येऊ शकतो. पण हे करणे अनिवार्य नाही.
मराठी विकिपीडियावर कार्यरत होताना विकिपीडिया:धोरणांची व मार्गदर्शक तत्त्वांची सूची अवश्य वाचावी.
- नवीन लेख तयार करणे.
- असलेल्या लेखांमध्ये भर घालणे आणि संदर्भ देऊन लिखाणाला बळकटी देणे.
- प्रकल्पासंदर्भात असलेली चित्रे स्वत: काढून / मिळवून (प्रताधिकारात न अडकता) विकिमीडिया कॉमन्स वर चढवणे आणि त्याची लिंक मुख्य लेखात देणे.
- इतर भाषांमधील लेखांची लिंक, आपआपल्या भाषेतील लेखांची लिंक इतर भाषांमधील लेखात देणे.
- सर्व लेखांना योग्य साचे, वर्ग आणि बाह्य दुवे देणे.
- असलेल्या लेखातील अशुद्ध लेखन दुरूस्ती करणे.
- इंग्रजी विकि मधील चांगले लेख मराठी विकिवर भाषांतरित करणे.
- माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देणे.
- मराठी विकिपीडिया प्रकल्प तयार करून त्या प्रकल्पाअंतर्गत नवीन लेख लिहिणे आणि असेलेले लेख परिपूर्ण करणे.
- सांगकामे (बॉट) म्हणजेच स्वयंचलित यंत्राद्वारे वारंवार करावी लागणारी संपादने करणारी यंत्रणा अधिक अद्ययावत करणे आणि संघटनेला बळकटी आणणे.
- मराठी विकिपीडियावर वरील कामे करण्यासाठी आपल्याला "मराठी विकिपीडिया" ची थोडीशी तोंड ओळख होणे आवश्यक आहे. त्यासाठी पहा - विकिपीडिया:सहाय्य पृष्ठ
- मराठी विकिपीडिया या संकल्पनेचा परिचय करून घेण्यासाठी पहा - विकिपीडिया:परिचय
- मराठी विकिपीडियावर संपादन कसे करावे यासाठी पहा - सहाय्य:संपादन
- नवीन सदस्यांना मराठी विकिपीडियावर काम करीत असताना काही जरी अडचण आली तर विकिपीडिया:मदतकेंद्र येथे आपल्या कोणत्याही शंकेचे निरसन मराठी विकिपीडियाचे जाणते सदस्य करतील.
- मराठी विकिपीडियावर विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे येथे पहा - सहाय्य:नेहमीचे प्रश्न
- मराठी विकिपीडियाकडून असलेल्या अपेक्षा, परीघ, आवाका आणि मर्यादा यांसाठी पहा - विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा
- मराठी विकिपीडियावर नवीन सदस्यांकडून अनवधानाने काही ढोबळ चुका होऊ शकतात, त्यासाठी पहा - विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रुटी
- मराठी विकिपीडिया काय आहे त्याहीपेक्षा काय नव्हे, हे जाणण्यासाठी पहा - विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे
- मराठी विकिपीडियामध्ये आपले लिखाण शुद्धच असायला हवे, त्यासाठी पहा - शुद्धलेखनाचे नियम
- मराठी विकिपीडिया काही प्रश्न आणि त्याची जुन्या जाणत्या सदस्यांनी दिलेली समर्पक उत्तरे विकिपीडिया:नीती, ध्येय, धोरणे विषयीचे प्रश्न, सहाय्य:नेहमीचे प्रश्न, विकिपीडिया:विकिपीडियाच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न येथे मिळू शकतील. या शिवाय अजून काही अडचण आली तर विकिपीडिया:मदतकेंद्र आहेच.
- मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने तयार केलेली मासिक पत्रिका पहा - विकिपीडिया:विकिपत्रिका
नवीन सदस्यांना नोंदणी केल्यावर पडलेला हा एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे.
- मराठी विकिपीडियाचे मुखपृष्ठ पाहिल्यास खालच्या बाजूला "संक्षिप्त सूची" दिलेली आहे. मराठी विकिपीडियामधील अत्यंत मोठ्या आणि मुख्य विभागांची नावे आणि उपविभाग, यांचे नामनिर्देश केले आहेत. आपल्या आवडीच्या विभागात जाऊन आपण त्यात भर घालू शकता तसेच नवीन लेख लिहू शकता.
- मराठी विकिपीडियामध्ये डाव्या पट्टीमध्ये "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. तुम्ही या पानावर इतरांकडून होत असलेले बदल तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा आणि लेखाचे स्वतः संपादन करा.
- मराठी विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
- याशिवाय आपल्याला आवडीचा कोणताही विषय, लेख, व्यक्ती ह्यांची माहिती मराठी विकिपीडियावर शोधा आणि त्यात भर घालायला सुरुवात करा. उदा. आपला आवडता - लेखक, कवी, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, खेळाडू, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, शास्त्रीय गायक, व्यक्ती, राजकारणी, पुरस्कार विजेते, स्वातंत्र्य सैनिक, पौराणिक व्यक्ती, कलावंत, वादक इत्यादी.
- आपणास एखाद्या विषयाची भरपूर आणि सखोल माहिती असेल तर त्या विषयासंदर्भात अनेक लेखांवर आपण काम करू शकता. उदा. भूगोल या विषयासंदर्भात जसे गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देश, पर्वत रांगा, नद्या, सागर, तलाव, मंदिरे अनेक लेख लिहिता येतील.
- नवीन लेख लिहिताना शक्यतो त्या विषयाच्या जवळचा लेख मदतीसाठी घेऊन लेख लिहिला तर लेख लिहिणे, फुलविणे, योग्य साचे, वर्ग, चित्रे, संदर्भ देणे सोपे जाते.
आम्हाला आशा आहे की, या सर्व गोष्टींचा आपणास उपयोग होईल आणि आपणाकडून "मराठी विकिपीडिया" वर भरपूर काम होईल. या संदर्भात आपण लेखांच्या चर्चापानावर तसेच चावडीवर चर्चा करू शकता.