टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
From Wikipedia, the free encyclopedia
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टी.सी.एस.) (बीएसई.: 532540, एनएसई.: TCS) ही १९६८ साली स्थापन झालेली, माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात भारतीय व्यापारी संस्था आहे. ही टाटा उद्योगसमूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टी.सी.एस. ही भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था आहे.[1]
जलद तथ्य ब्रीदवाक्य, प्रकार ...
ब्रीदवाक्य | एक्स्पीरियन्स सर्टन्टी |
---|---|
प्रकार | सार्वजनिक |
उद्योग क्षेत्र | माहिती तंत्रज्ञान |
स्थापना | १९६८ |
संस्थापक | जे. आर. डी. टाटा |
मुख्यालय | मुंबई |
महत्त्वाच्या व्यक्ती |
रतन टाटा (बोर्ड अध्यक्ष) एन.चंद्रशेखरनं (मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक) एस्. पद्मनाभन् पी. वांद्रेवाला |
महसूली उत्पन्न | १५ अब्ज ५ कोटी अमेरिकन डॉलर (२०१४-१५) |
निव्वळ उत्पन्न | ३ अब्ज ५ कोटी |
कर्मचारी | ३,३५,६२० (ऑगस्ट २०१५ रोजी) |
संकेतस्थळ | टीसीएस्.कॉम |
बंद करा