जॉन ओस्वाल्ड
From Wikipedia, the free encyclopedia
जॉन ओस्वाल्ड (३० मे, इ.स. १९५३:किचनर, ओन्टॅरियो - ) हा कॅनडातील संगीत रचनाकार, वायुवाद्यवादक, माध्यम कलाकार आणि नर्तक आहे. त्याच्या ध्वनिचौर्य या प्रकल्पामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. (आधीच) अस्तित्वात असलेल्या संगीत रचनांमधून नवे संगीत निर्माण करणे हे ध्वनिचौर्यसमजले जाते. त्याच्या तथाकथित नवनिर्मितीमुळे ओस्वाल्ड युरोपियन-पाश्चात्त्य संगीत विश्वात अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. माईल्स बोवी हा संगीत समीक्षक व लेखक उपहासाने ओस्वाल्डला "संगीतध्वनिचौर्याचा जनक' असे संबोधतो[1]
कॅनडा कौन्सिल फॉर आरट्स या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या २००४ सालच्या वार्षिक गव्हर्नर जनरल्स अवॉर्ड् इन व्हिज्युअल अँड मीडिया आर्ट्स या पुरस्कार विजेत्यांच्या सातजणांच्या यादीत ओस्वाल्डचा समावेश होता. त्याला मीडिया आर्टिस्ट हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.[2] लंडन ऑबझर्व्हर ने त्याला पृथ्वीवरचा सर्वात झपाटलेला माणूस म्हणले आहे.[3]