जपान एरलाइन्स
From Wikipedia, the free encyclopedia
जपान एरलाइन्स (जपानी: 日本航空) ही जपान देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी (ऑल निप्पॉन एरवेझ खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.
| ||||
स्थापना | १ ऑगस्ट १९५१ | |||
---|---|---|---|---|
हब |
हानेडा विमानतळ नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
मुख्य शहरे |
कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ नागोया फुकुओका नाहा सप्पोरो | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | जे.ए.एल. माइलेज बँक | |||
अलायन्स | वनवर्ल्ड | |||
विमान संख्या | १६३ | |||
गंतव्यस्थाने | ९२ | |||
ब्रीदवाक्य | Fly into tomorrow | |||
मुख्यालय | टोकियो |
सध्या जपान एरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.[1]
ही जपानची ध्वजवाहक विमानकंपनी आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एरवेझ नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.[2] यांचे मुख्य कार्यालय जपानमधील तोक्यो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र तोक्योचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.